गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन दरम्यान जास्तीत जास्तवेळ घरात बंद असल्याने अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागला होता. ताण तणावामुळे मानसिक आजार उद्भवल्याचे अनेक रिसर्चमधून दिसून आले. भारतातील तब्बल ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत असल्याचा खुलासा झाला आहे. GOQii द्वारे स्मार्ट-टेक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक रिसर्च करण्यात आला होता. यात जवळपास १० हजारांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग होता.
भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं. या अभ्यासात दिसून आलं की, २६ टक्के लोकांना हळूहळू नैराश्य येत होते तर ११ टक्के लोक नैराश्याच्या मधल्या टप्प्यात होते. ६ टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणं दिसून आली होती. गेल्या पाच महिन्यांपासून अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.
लॉकडाऊन, अती काळजी, पगार कपात, बेरोजगारी आरोग्य धोक्यात असणं आणि एकूणच अस्थिर वातावरणामुळे ताणतणाव वाढला आहे. जास्त प्रमाणात तणाव असल्यामुळे नैराश्य येतं. लॉकडाऊन आणि जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामळे जवळपास ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत आहेत. असं या अभ्यासात म्हटलं आहे. पीएचक्यू -9 (मानसिक विकारांबाबत मूल्यांकन करण्याचा एक प्रकार) यावर हा अभ्यास आधारीत होता. एखाद्या व्यक्तीचा दैनंदिन कामातील रस, भूक, झोपेचे चक्र, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि उर्जा पातळी यासह नऊ पैलू विचारात घेतले होते.
तज्ज्ञांनी सांगितले की, ''आमचा अभ्यास असे दर्शवितो की देशभरातील वाढती रुग्णसंख्या, कोरोना व्हायरसचा परिणाम आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. (mounting uncertainty) अनिश्चितता उच्च ताणतणावाला कारणीभूत ठरत असून संतुलित आहार, जीवनशैलीत बदल आणि झोपेच्या योग्य पद्धतींनी नियंत्रित केले जाऊ शकते," असे GOQii चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल म्हणाले. 'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन
एका अभ्यासाने असे सुचवले आहे की एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या कामात व्यायाम जोडल्यास त्यांचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. व्यायामामुळे एंडोर्फिन (आनंदी संप्रेरक) तयार होऊ शकतो ज्यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.व्यायाम न केल्यास मानसिक ताण किंवा नैराश्य वाढण्याची शक्यता नसते. म्हणून जास्तीत जास्त गोष्टी या स्वतःला खूश ठेवण्यासाठी करायला हव्यात. चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा