शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन; घरी बसून लोक होत आहेत 'या' गंभीर आजारांचे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:33 PM

घरच्याघरी सुद्धा आजारांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरूवात केली आहे.  

कोरोनामुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या जगभरात वाढत आहे. लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनापासून लोकांचा बचाव होत असला तरीसुद्धा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. घरच्याघरी सुद्धा आजारांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरूवात केली आहे.  मानसिक स्वरूपाचे आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवल्याचं दिसून आलं आहे.

इंडीयन सायकेट्रीक सोसायटीने याबाबत सर्वेक्षण केलं. या दिवसांमध्ये डिप्रेशनच्या प्रकरणांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जवळपास २०० दशलक्षपेक्षा जास्त भारतीय मानसिक आजारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जात आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. अशाच काही घटनांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोना संशयिताने घाबरून सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोकांना सर्दी-खोकला झाला तरी भीती वाटू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी एकटेपणामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. इतकंच नाही तर  कोरोनाच्या भीतीने पंजाबमध्ये पती-पत्नीने स्वतःला संपवलं. 

द लँसेटने यांनी प्रकाशित केलेल्या रिसर्चनुसार क्वारंटाइनमध्ये राहिल्याने मानसिक आरोग्यावर जो परिणाम होत आहे तो दीर्घकाळपर्यंत राहू शकतो. डिप्रेशनशिवाय पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर  देखील होऊ शकतं. युनिव्हरसिटी ऑफ सेफिल्ड आणि अलस्टर युनिव्हरसिटीने अलिकडे २०० लोकांवर रिसर्च केला होता.

यात लोकांची मानसिक स्थिती कशाप्रकारे बदलते याचा अभ्यास करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ९६ टक्के लोकांनी सांगितलं की, रात्री झोपेतून जागे झाल्यानंतरही ते साबणाने हात धुतात.  ७० टक्क्यापेक्षा जास्त लोक म्हणाले की, टॉयलेट पेपरपासून अनेक गोष्टींची जास्तीची खरेदी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या