शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

दुधामुळे वजन कमी होतं की वाढतं? पाहा सत्य काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:37 PM

वजन कमी करताना आहारात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला जातो. यामुळे प्रश्न पडतो की खरंच दुधामुळे वजन वाढू शकते का ?

वजन कमी करण्याबाबत सजग असलेल्या लोकांना कोणते खाद्यपदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत याबाबत अनेक शंका असतात. अशावेळी बऱ्याच जणांना दूध प्यावे की पिऊ नये असाही प्रश्न पडतो. आहारात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला जातो. यामुळे प्रश्न पडतो की खरंच दुधामुळे वजन वाढू शकते का ?

दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्त्वे असतात. आरोग्यासाठी महत्त्वाचे आणि अनेक पोषक घटकांनी दूध परिपूर्ण असले तरीही त्यामध्ये काही प्रमाणात फॅटही असते. यामुळे वजन वाढू शकते.असे असले तरीही शरीराला दररोज कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डीची आवश्यकता असते. याकरिता डाएटमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वजन कमी करण्यासाठी पोषक ठरतात.

दुधात वजन वाढण्याशी संबंधित मॅक्रोन्यूट्रिएंट गुणधर्मही असतात तसेच सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. या दोनही घटक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. 250 मिली संपूर्ण दुधात (1 कप) जवळजवळ 5 ग्रॅम चरबी आणि 152 कॅलरीज असतात.

एका अभ्यासानुसार , ज्या लोकांनी सहा महिने दररोज दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले त्यांचे वजन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केलेल्यांच्या तुलनेत 5.4 किलोग्रॅमने कमी झाले. तसेच अभ्यासकांनी असेही सांगितले आहे की, जे लोक आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करतात त्यांचे वजन अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते. त्यांच्या कमरेचा घेरदेखील कमी असतो. दुधातील कॅल्शियममुळे लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाईप 2 मधुमेह, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोकाही टाळता येऊ शकतो.

दुधामुळे खरंच वजन वाढते का ?दुधामुळे वजन वाढू शकत नाही. दुधात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. स्नायू आणि हाडांच्या मजबुतीकरिता दुधाची आवश्यकता असते. शिवाय दुधात झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीनवस्त्त्व बी 12, जीवनसत्त्व डी या पोषक तत्त्वांचा समावेश असल्याने प्रतिकारशक्ती वाढते. चयापचय क्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते. 250 मिली. दुधात 8 ग्रॅम प्रथिने आणि 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. त्यामुळे दररोज शरीरासाठी आवश्यक असले त्या प्रमाणात आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. सकाळी नाश्त्यावेळी एक ग्लास दूध घेतले तर आपली भूक शमते. कारण दुधात भूक शमवणारेही गुणधर्म असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना दूध प्यायल्यास पोटही भरलेले राहते. यामुळे कमी खाल्ले गेले तरी डाएटही पाळले जाते.

वजन कमी करणाऱ्यांसाठी…जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमच्या आहारातून दूध आणि दुग्धजन्य उत्पादने कमी करण्याची गरज नाही. दूध हे संतुलित आहाराचा अत्यावश्यक भाग आहे. दररोज एक कप दूध किंवा 250 मिली दूध तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करू शकते. व्यायामानंतर प्रोटीन शेक घेत असाल तर ते दुधात घाला. जर तुम्ही लैक्टोज घेत असाल तरच दूध घेणे टाळावे. अशावेळी सोया आणि नट मिल्क यासारखे दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स