कोरोना व्हायरसच्या माहामारीशी संबंधित चुकीच्या सुचनांचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्र एवं प्रोद्योगिक कंपन्यांना सहयोग करण्याचे भारतानं निवेदन दिलं आहे. यादरम्यान खोटी माहिती आणि बातम्या, व्हिडीओ यांमुळे माहामारीचा सामना करताना प्रशासकिय यंत्रणांवर लोक कमी विश्वास ठेवतात. संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या महासभेत शांतीची संस्कृती या कार्यक्रमादरम्यान कोरोना व्हायरसच्या दीर्घकालीन परिणामांवर चर्चा करण्यात आली. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या दोन कोटी ८० लाख केसेस समोर आल्या आहेत. तर ९ लाख लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.
संयुक्त राष्ट्राचे भारतील स्थायी मिशन काऊंसलर पाऊलोमी त्रिपाठी यांनी सांगितले की, ''कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी समाजात वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. खोटी माहीती पसरल्यामुळे कोरोनाचा धोका जास्त वाढत आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत नाही. या माहामारीच्या काळात सामाजिक आणि राजनैतिक शत्रुता वाढवण्यासोबतच देशांमधील ताण तणावाचं वातावरण वाढत आहे. याशिवाय हिंसा, कट्टरता, भेदभाव वाढीस लागला आहे. देशांमधील प्राद्योगिक भागिदारी आणि संबंधांमध्ये सहयोग ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून चुकीच्या माहितीचा प्रसार रोखता येऊ शकेल.''
चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस
चीनमधील तज्ज्ञांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. नेजल स्प्रे च्या स्वरुपात ही लस असेल. या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली असून नोव्हेंबरपर्यंत या लसीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी जवळपास १०० लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, झीमान युनिव्हर्सिटी आणि बिजिंग वातांय बायोलॉजिकल फार्मसीमधील शास्त्रज्ञांकडून ही लस तयार करण्यात आली आहे.
चीनच्या नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून या लसीला परवानगी देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे मायक्रोबायोजिस्ट आणि प्रमुख शास्त्रज्ञ युयेन याँग यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीमुळे व्हायरसला प्रवेशमार्गात म्हणजेच नाकातून शरीरात जाण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच या लसीमुळे कोरोना व्हायरशी लढण्यासाठी एंटीबॉडी विकसित करण्यास मदत होईल. या लसीच्या लसीकरणासाठी दुप्पटीनं खबदारी घेतली जाणार आहे. कोरोना व्हायरस आणि इन्फ्लुएंजा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस परिणामकारक ठरेल. या नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीच्या तिन्ही चाचण्या पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागू शकतो.
पुढे त्यांना सांगितले की, इन्जेक्शनच्या तुलनेत नाकाद्वारे दिली जाणारी लस मोठ्या प्रमाणावर लोकांचा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तसंच उत्पादनासाठी सोईची ठरणार आहे. याशिवाय या लसीमुळे श्वसनप्रणालीवर कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आपातकालीन स्थितीत या लसीच्या उत्पादनासाठी चीनच्या काही खासगी कंपन्याना परवागनी देण्यात आली आहे.
हे पण वाचा-
मास्क वापरताना 'या' चुका केल्यानं वाढतो कोरोना संसर्गाचा धोका; WHO नं दिल्या गाईडलाईन्स
वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार