Myth about shilajit: शिलाजीतचं नाव ऐकताच पुरूष किंवा तरूणांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. शिलाजीतबाबत पुरूष वेगवेगळ्या कल्पनाही करतात. काही लोकांचं मत आहे की, शिलाजीत पुरूषांसाठी वायग्रासारखं काम करतं. तर काही लोक म्हणतात की, शिलाजीत घेतल्याने शक्ती मिळते. तसेच काही लोक म्हणतात शिलाजीतने फार नुकसान होतं. असे अनेक समज-गैरसमज शिलाजीतबाबत लोकांच्या मनात राहतात. तुमच्याही मनात असेच काही विचार असतील तर जाणून घेऊ शिलाजीतबाबतचे गैरसमज.
मुळात शिलाजीतचा औषध म्हणून वापर भारतात 5 हजार वर्षांपासून केला जातो. शिलाजीत हिमालयाच्या 18000 फूट उंचीवर सापडतं. शिलाजीत आपल्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. शिलाजीतने प्रजननाच्या शक्तीत वाढ तर होते, पण हे वायग्रासारखं काम करत नाही. हिंदुस्थान टाइम्सच्या एका वृत्तात शिलाजीतच्या गैरसमजाबाबत एक्सपर्टने बरंच काही सांगितलं आहे. कपिवामध्ये रिसर्च अॅन्ड डेवलपमेंटच्या प्रमुख डॉ कीर्ति सोनी यांनी शिलाजीतच्या समज-गैरसमजावरून पडदा उठवला.
1) शिलाजीत वायग्रासारखं काम करतं
जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, शिलाजीत वायग्रासारखं काम करतं. डॉ. कीर्ति यांनी सांगितलं की, असं अजिबात नाहीये. निश्चितपणे शिलाजीतमुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची वाढ होते. पण शिलाजीत वायग्रासारखं काम करत नाही. जेव्हा डॉक्टर सांगितल तेव्हाच शिलाजीतचं सेवन करा. जर स्वत:च्या मनाने तुम्ही हे घेतलं तर याने नुकसानही होऊ शकतं.
2) केवळ कच्च शिलाजीत शुद्ध
लोकांच्या मनात ही सुद्धा एक चुकीची धारणा आहे की, शिलाजीतचं केवळ कच्च रूपच शुद्ध असतं. मुळात सत्य हे आहे की, शिलाजीतचं कच्च रूपात सेवन केलं तर विषारी पदार्थ आपल्या पोटात जाऊ शकतात. शिलाजीत हे डोंगराळ भागात मिळतं, अशात त्यात शीसे, कॅडमियम, आर्सेनिक इत्यादी नुकसानकारक तत्व असू शकतात. त्यामुळे शिलाजीतला संशोधित केलं जातं.
3) शिलाजीतचं नियमित सेवन नुकसानकारक
काही लोकांना असं वाटतं की, शिलाजीतचं नियमित सेवन केल्याने नुकसान होतं. पण असं अजिबात नाहीये. एनर्जी देणारं शिलाजीत चांगलं सप्लीमेंट आहे. शिलाजीतचे इतर अनेक शारीरिक फायदे आहेत. पण याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं.
4) शिलाजीतचं सेवन उन्हाळ्यात करू नये
अनेकांना असं वाटतं की, शिलाजीत उष्ण असतं. त्यामुळे त्याचं उन्हाळ्यात करू नये. पण मुळात हिवाळा असो वा उन्हाळा याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे. ज्यांना पचनासंबंधी समस्या आहेत त्यांनी याचं सेवन उन्हाळ्यात कमीच केलं पाहिजे. हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी शिलाजीतचा वापर चांगला असतो. पण याचा अर्थ असा नाही की, याचा उन्हाळ्यात वापर करू नये.