रक्तदाबाची समस्या सध्याच्या काळात तरूणांपासून सगळ्यांनाच जाणवत असतात. अनियमित जीवनशैली, बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाणे, कमी झोप, मोबाईलचा जास्त वापर त्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. अतिराग केल्यामुळे, मद्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे, ताण-तणावामुळे बीपीचा त्रास वाढतो हे खरं असलं तरी बीपी लो होणे किंवा बीपी हाय होणे याबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत.
उच्च रक्तदाबाच्या समस्येला हायपरटेंशन सुद्धा म्हटलं जातं. जर वेळेवर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाने उपचार घेतले नाहीत तर हृदयरोग, स्ट्रोक, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. ही एक गंभीर समस्या आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही गैरसमज उलगडून सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील बीपी संबंधी गैरसमज दूर होतील.
१ उच्च रक्तदाब एक सामान्य समस्या आहे. या समस्येसाठी काळजी करण्याचं काही कारणं नसतं.
असं नसून उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृद्य आणि शरीरातील अनेक अवयवांना नुकसान पोहोचत असतं. या आजाराला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. कारण कधीही मृत्यू होण्याची शक्यता असते.
२ उच्च रक्तदाबाची समस्या लवकर बरी होत नाही
उच्च रक्तदाबाच्या समस्येवर कोणताही उपाय केल्यास ही समस्या लगेच बरी होत नाही. हे खरं असलं तरी. उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याआधी थांबवता येऊ शकते. त्यासाठी स्वतःच आरोग्य नीट राहील अशी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करा. रोज व्यायाम करा. ताण-तणावमुक्त रहा. मादक पदार्थांचे सेवन करू नका. या पध्दतींचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येला नियंत्रणात ठेवू शकता.
३. उच्च रक्तदाबाचा त्रास महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक उद्भवतो.
सध्याच्या काळात अनेकांना आपल्या कामामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे ताण तणावाचं जीवन जगावं लागतं. त्यामुळे रक्तदाबाची समस्या महिलांना तसंच पुरूषांना दोघांना समान प्रमाणात होत असते. वयाच्या चाळीशीनंतर मासिकपाळी ज्यावेळी बंद होण्याच्या मार्गावर असते. त्यावेळी महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो. ( हे पण वाचा-पाळी थांबणार असेल तर शरीरात होतात 'हे' बदल, वाचा कोणते?)
४. उच्च रक्तदाबाची समस्या अधिक वय असलेल्या लोकांनाच उद्भवते.
उच्च रक्तदाब एक अशी समस्या आहे जी ४० वयानंतर चिंतेचे कारण ठरत असते. पण अनेक रिसर्चनुसार रक्तदाबाची समस्या ही तरूण मुलांना सुद्धा तितक्याच प्रमाणात उद्भवते हे सिद्ध झाले आहे. कारण तरूण मुलंमुली खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. आहारात फास्ट फुडचा समावेश जास्त असतो. फोनचा वापर जास्त करत असल्यामुळे रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे चुकीच्या सवयींमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवत असते. ( हे पण वाचा-डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्)