(Image Credit : newsroom.unsw.edu.au)
वजन कमी करणं काही लोकांसाठी फारच कठीण होऊन बसतं. योग्य आहार आणि एक्सरसाइज करूनही अनेकदा लोकांचं वजन कमी होताना दिसत नाही. उलट ते आणखी वाढलेलं दिसतं. तर काही लोक वजन कमी करतात, पण नंतर वजन कमी केल्याने झालेल्या बदलांमुळे आजारी पडू लागतात. याला कारणीभूत लोकांकडून केल्या जाणाऱ्या काही चुका असू शकतात.
इम्यूनिटी, मसल्स लॉस आणि कमजोरी सारख्या समस्या वजन कमी झाल्यावर होऊ लागतात. ज्या या गोष्टींचा संकेत आहेत की, तुमचं वजन कमी करणं हेल्दी तुमच्यासाठी हेल्दी नाही. त्यामुळे जर तुम्हाला वजनही कमी करायचं आहे. आणि नंतर कोणत्याही समस्या नको असतील तर काही चुका करणं टाळलं पाहिजे.
लो कॅलरी पदार्थ खावीत
आहारातून मिळणाऱ्या कॅलरीने शरीरातील कार्यप्रणालीसाठी आवश्यक शक्ती मिळते. वजन कमी करण्यासाठी तर लो-कॅलरी डाएट गरजेची आहे. पण जेव्हा तुम्ही आहारातून कमी कॅलरी घेता, तेव्हा शरीराला आवश्यक तेवढी शक्ती मिळू शकत नाही. या स्थितीत तुमचं शरीर तुमच्या शरीरात असलेल्या बॉडी फॅट आणि तुमच्या मांसपेशीमुळे शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. याप्रकारे तुम्हाला शारीरिक रूपाने कमजोरी जाणवू लागते. ही स्थिती फार घातक आहे. कारण यामुळे अनेकदा डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर आणि ग्लूकोज लेव्हल्स फार कमी होतं. जे तुमच्यासाठी जीवघेणंही ठरू शकतं.
प्रोटीनची कमतरता ठरू शकते जीवघेणी
ही आणखी एक मोठी चूक आहे जी वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आणि डायटिंग करतेवेळी होते. कमी जेवण करण्याच्या नादात लोक आपल्या डाएटमधून प्रोटीनचं प्रमाण कमी केलं जातं. असं करू नये. कारण यामुळे हेल्दी वेट लॉसचं तुमचं लक्ष्य पूर्ण होऊ शकत नाही. एक्सपर्ट सुद्धा हेच सांगतात की, वजन कमी करण्यादरम्यान आपल्या शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीनची गरज पडते. प्रोटीन कमी झाल्याने मांसपेशींचं नुकसान होतं. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्या आहारात दूध, डाळी, पनीर, डेअरी उप्तादने यांचा समावेश करा.