किडनी शरीरातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. किडनी शरीरातून आम्ल बाहेर काढून पाणी, मीठ आणि खनिजे संतुलित करते. नसा, स्नायू आणि ऊतींचे योग्य संतुलन नसल्यास मानवी शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड निकामी किंवा खराब होऊ शकतं
वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापरनॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना निवारक म्हणून काम करतात. पण बऱ्याच लोकांना माहिती नसते की, त्यांचा अतिवापर किडनीला खूप लवकर खराब करू शकतो. विशेषत: ज्यांना आधीच मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यामुळं वेदनाशामक गोळ्यांचा नियमित वापर कमी करा आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या घ्या.
मीठउच्च सोडियम (मीठ) असलेला आहार रक्तदाब वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर जेवणात मीठ कमी वापरण्याची शिफारस करतात.
प्रक्रिया केलेले अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ सोडियम आणि फॉस्फरसने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन केल्याने आपल्या किडनीला मोठे नुकसान होऊ शकते. उच्च फॉस्फरस असलेले प्रक्रिया केलेले अन्न केवळ आपल्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवत नाही, तर ते आपल्या हाडांसाठी घातक देखील ठरू शकते.
शरीराला हायड्रेटेड न ठेवणेशरीर हायड्रेटेड होत असताना विषारी घटक आणि अतिरिक्त सोडियम बाहेर पडतात. म्हणूनच आपण दिवसा पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. डॉक्टर म्हणतात की एका निरोगी व्यक्तीने दिवसातून सुमारे ४ ते ५ लिटर पाणी प्यावे.
साखरेचे अतिसेवनसाखरेचा जास्त वापर लठ्ठपणा वाढवतो आणि डायबिटीस, उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढवतो. या दोन्ही रोगांमुळे एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड खराब होऊ शकते. म्हणून, आपण गोड बिस्किटे किंवा ब्रेड यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे ज्यात जास्त साखर आढळते.
एकाच ठिकाणी बसून कामदिवसभर एकाच ठिकाणी बसून किंवा शरीर पूर्णपणे निष्क्रिय ठेवल्याने किडनीचे आजारही होऊ शकतात. अशा वाईट जीवनशैलीचा आपल्या किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. रक्तदाब आणि चयापचय योग्य ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.