शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पुरुषांच्या आरोग्यासंबधित 'हे' गैरसमज कुणालाही खरे वाटतात, पण सत्य आहे वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 6:25 PM

पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी अशीच काही मिथकं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जी पुरुषांवर लादली गेली आहेत. प्रत्यक्षात सत्य काही वेगळंच आहे.

स्त्री आणि पुरुष (Men) दोघेही तणाव, चिंता (Anxiety), नैराश्याने ग्रस्त असतात. महिलांच्या तुलनेत पुरुष त्यांची मानसिक स्थिती इतरांसोबत शेअर करण्यास टाळाटाळ करतात. अनेक पुरुष त्यांच्या मनातील भावना आणि तणावाबाबत, त्या मागच्या कारणांबाबत उघडपणे बोलत नाहीत. कारण आजही पुरुषांनी आपल्या भावना व्यक्त करणं समाजात निषिद्ध (Taboo) मानलं जातं. ओन्ली माय हेल्थ वेबसाईटच्या मते, कोरोना महामारीच्या काळात अशा मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्या महिलांसोबतच पुरुषांमध्येही दिसल्या. पण बहुतांश पुरुषांनी त्या समस्या इतरांसोबत शेअर करणं टाळलं.

तणाव (Stress) आणि नैराश्याने (Depression) ग्रासलेल्या अनेक पुरुषांनी त्यांच्या समस्या दुसऱ्यासोबत शेअर करण्यापेक्षा स्वतःचं जीवन संपवणं योग्य मानलं. त्यामुळेच आता पुरुषांच्या मानसिक आरोग्याची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या मिथक आणि वास्तवाबद्दल आता बोललं जात आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी अशीच काही मिथकं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जी पुरुषांवर लादली गेली आहेत. प्रत्यक्षात सत्य काही वेगळंच आहे.

पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित काही मिथकं आणि सत्य

पुरुष कधीही रडत नाहीतलहानपणापासून पुरुषांना शिकवलं जातं की मुली रडतात, मुलं नाही. मात्र, सत्य काही वेगळंच आहे. रडणं ही एक मानसिक भावना आहे, जी तणाव कमी करण्यासाठी मदत करते. पण जेव्हा माणूस रडत नाही आणि ताणतणाव असूनही स्वत: खंबीर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरं तर त्याला आतून खूप दडपण जाणवत राहतं आणि तो अस्वस्थ राहतो. अशावेळी त्यांनी आपल्या भावना कुठेतरी शेअर करणं आणि मेडिटेशनची मदत घेणं महत्त्वाचं असतं.

पुरुष भावनिक नसतातप्रत्येक माणसाप्रमाणे पुरुषही भावनाप्रधान असू शकतो. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. पुरुषांचं भावनिक असणं, ही एक सामान्य गोष्ट असल्याचं मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर सांगतात. त्यामुळे पुरुषांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा, त्या शेअर करण्याचा अधिकार आहे.

पुरुषांना मानसिक आधाराची गरज नसतेपुरुषांना मानसिक आधाराची गरज नसते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण तसे अजिबात नाही. पुरुषांनाही मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे ते स्वतःला एकटं असल्याचं समजत नाहीत आणि अधिक चांगलं त्यांना जगता येतं.

पुरुष जास्त रागावतातराग येणं ही प्रत्येकासाठी सामान्य गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल आणि ती त्याच्या मनातील गोष्ट सांगू शकत नसेल किंवा मानसिकदृष्ट्या थकली असेल, तर कोणत्याही व्यक्तीला राग येऊ शकतो. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष.

आरोग्याची आपण काळजी घेतो तशाच प्रकारे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच पुरुषांनी मानिसक आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आपल्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स