जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचं असेल या लेखातील माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते. वजन कमी करताना जास्तीत जास्त लोक डाएटवर फोकस करतात. ही चांगली बाब आहे. पण अनेकदा लोक पदार्थांच्या कॉम्बिनेशनमध्ये चूक करतात. हेच पदार्थांचे कॉम्बिनेशन आपल्याला वजन कमी (Weight Loss Tips) करण्यात मदत करतात. आज आम्ही तुम्हाला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असेच काही पदार्थांचे कॉम्बिनेशन सांगणार आहोत ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
डायटिशिअन डॉ. रंजना सिंह यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी लोकांना कमी कॅलरी असलेले पदार्थ खावेत. त्यासाठी तुम्ही डाळी, पालेभाज्या, सॅलड, सूप, स्प्राउ्टससोबत लिंबू, पेरू, संत्री आणि पपई खाऊ शकता. त्यासोबतच काही पदार्थ एकत्र खाल्ल्यावरही वजन कमी करण्यास मदत मिळते. (हे पण वाचा : झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, वजन तर वाढेलच अन् पोटही बाहेर येईल!)
पुदीना आणि लिंबासोबत ग्रीन टी चं सेवन
वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक लिंबाचा रस टाकून ग्रीन टी चं सेवन करतात. तर ग्रीन टी सोबत पुदीन्याचं सेवन करणंही फायदेशीर ठरतं. लिंबू आणि पुदीन्याच्या पानांसोबत ग्रीन टी तुम्हाला जास्त वेळ हायड्रेटेड ठेवू शकते. याने तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळेल. पुदीन्याचा पानांना भूक कमी करण्यासाठी ओळखलं जातं. याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटेल. ज्यामुळे तुम्ही जास्त खाणंही टाळू शकता. (हे पण वाचा : आपण रोज खात असलेल्या 'या' पदार्थामुळे कमजोर होते इम्यूनिटी, वेळीच व्हा सावध नाही तर....)
सफरचंद आणि पीनट बटर
वजन कमी करण्यासाठी पीनट बटर आणि सफरचंद एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. सफरचंदमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळेच याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. तसेच पीनट बटरमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतं. ज्याने वजन कमी करण्यास तुम्हाला मदत मिळेल. तसेच पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतं.
दलिया आणि अक्रोड
वजन कमी करण्यासाठी दलिया आणि अक्रोड एकत्र खाऊ शकता. दलिया फार हलका असतो. याचं नियमित सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर असतं. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं. तसेच याने पचनतंत्रही चांगलं राहतं. यात फॅट जास्त प्रमाणात नसतं. तेच अक्रोडमध्येही अनेक पोषक तत्व असतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे तज्ज्ञ दलिया आणि अक्रोड एकत्र खाण्याचा सल्ला देतात.
दही आणि दालचीनी
तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारात दही आणि दालचीनीचा समावेश करा. दह्याचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मात्र, दह्याला अधिक प्रभावी करण्यासाठी यात एक चिमुटभर दालचीनी टाका. अॅंटीऑक्सीडेंट आणि इतर पोषक असलेल्या दालचीनीने शरीरात जमा फॅटचं प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. याने वजन कमी होतं.