शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:40 AM

हिवाळा सुरु झाला की, मधाचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर वाढल्याचं बघायला मिळतं. कारण यापासून होणारे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत.

हिवाळा सुरु झाला की, मधाचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर वाढल्याचं बघायला मिळतं. कारण यापासून होणारे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत. वजन कमी करण्यासाठी तर अलिकडे सर्रास कोमट पाण्यात मध टाकून सेवन केलं जातं. मध हे एक असं नैसर्गिक औषध आहे, जे त्वचा आणि आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं ठरतं. जे लोक आरोग्याबाबत फार जागरुक असतात ते तर चहा किंवा दुधात साखरेऐवजी मध टाकतात. मात्र याने अनेक फायदे असले तरी काही दुष्परिणामही आहेत. मधाचं फार गरम पदार्थांसोबत सेवन करण हानिकारक ठरु शकतं.  

काय होतं नुकसान?

आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठून गरम पाण्यात मध टाकून सेवन करतात. यामागे त्यांचा विचार असतो की, याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि शरीर फ्रेश राहतं. तुम्हीही रोज सकाळी हे पाणी सेवन करत असाल तर ही सवय वेळीच सोडा. आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि न्यूट्रिशनिस्ट् यांचं मत आहे की, जे तुम्ही आरोग्यासाठी चांगलं म्हणून सेवन करताय, ते तुमच्यासाठी एकप्रकारे विष ठरतंय.  कसा करावा बचाव?

गरम पाणी किंवा दुधासोबत मध घेणे खरंतर एकप्रकारे टॉक्सिक आहे. जे विषापेक्षा कमी नाहीये. तसेच अनेकांना हेही माहीत नसतं की, कोणत्याही परिस्थितीत मध गरम करु नये. पण अनेकजण तसं करतात. आयुर्वेदातही तसा उल्लेख केला आहे. 

आयुर्वेदानुसार

आयुर्वेदानुसार, मध हे तसंच कशासोबतही न घेता फायदेशीर ठरतं. जर याला गरम केलं गेलं तर यातील गुण नष्ट होतात आणि असे काही विषारी पदार्थ होतात ज्याने शरीराचं नुकसान होतं. याचा प्रभाव थेट पचनक्रियेवर पडतो. ज्याप्रकारे मध पचन व्हायला वेळ लागतो, त्याचप्रमाणे यातून टॉक्सिन तयार होतं तेव्हाही ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे शरीरात पचनक्रियेबाबत वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. 

बाजारात भेसळयुक्त मध मोठ्या प्रमाणात मिळतं. त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त आहेत. बाजारात विकायला आणण्याआधी हे मध जास्त तापमानावर गरम केलं जातं. त्यामुळे हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यासोबतच हे मध प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवलं जातं, त्यामुळे त्याची क्वालिटी आणखी घसरते. 

योग्यप्रकारे करा वापर

आम्ही हे नाही सांगत की, तुम्ही मध सेवन करणे सोडा. मधाचा तुमच्या नियमीत आहारात समावेश करायलाच हवा. पण हे दुकानातून प्रक्रिया केलेले मध विकत घेण्याऐवजी मुख्य स्त्रोतातून मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच मध तुम्हाला दुधासोबत घ्यायचे असेल तर हे याची काळजी घ्या की, दूध थंड असेल.

विज्ञान काय सांगतं?

मध गरम का करु नये यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण असतं, तो गरम केल्याने त्यातून एक केमिकल निघू लागतं. या केमिकलला 5-hydroxymethylfurfural  किंवा HMF। असं म्हटलं जातं. याने केमिकलमुळे कॅन्सरचा धोका फार वाढतो. 

एक घातक कॉम्बिनेशन

मधाला १४० डिग्रीपेक्षा कमी गरम करणे सुरक्षित आहे. जे गरम दुधापेक्षा फार कमी असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही गरम दुधात मध घेता तेव्हा त्याचे गुण नष्ट होतात. आणि मध विषारी होऊन त्याने शरीराला नुकसान होतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सfoodअन्न