शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
2
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
4
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
7
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
10
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
11
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
13
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार
14
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
15
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
16
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
20
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

'या' दोन पोषक तत्वांचं मिश्रण ठरू शकतं जीवघेणं, अनेक पटीने वाढतो स्ट्रोकचा धोका! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 11:29 AM

शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत इतरही अनेकप्रकारच्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात.

(Image Credit : healthcenter.augmentcare.com)

शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक अनेकदा व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत इतरही अनेकप्रकारच्या सप्लिमेंट्सचा आधार घेतात. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, सप्लिमेंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहेत. एनल्स ऑफ इंटरनॅशनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चं स्ट्रोकचा धोका वाढवू शकतं.

telegraph.co.uk दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्चचे लेखक आणि वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक सफियू खान म्हणाले की, आतापर्यंत व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम वेगवेगळे घेतल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडल्याचा काहीही पुरावा नाही. असंही होऊ शकतं की, हृदयरोग वेगळ्या कारणांनीही होत असावेत. पण आमचं विश्लेषण सांगतं की, सप्लिमेंट्स आणि हृदयरोग यांच्यात काहीना काही संबंध आहे. ते म्हणाले की, सप्लिमेंट्स हृदयरोगाचा धोका कमी करण्याऐवजी वाढवतात. ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

या रिसर्चच्या अभ्यासकांनी जगभरातील ९९२, १२९ सहभागी लोकांचा डेटा एकत्र करून त्याचं विश्लेषण केलं. ज्यात त्यांना आढळलं की, कमी मिठ असलेलं जेवण, ओमेगा ३ फॅटी अॅसिड सप्लिमेंट्स फॉलिक अॅसिड सप्लिमेंट्स काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात, पण इतर दुसरे सप्लिमेंट्स शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे इरिन मिकोस म्हणाले की, लोकांनी त्यांच्या शरीराची पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन आणि सप्लिमेंट्सऐवजी आहारावर लक्ष द्यावं. जर त्यांना चांगला आहार घेतला तर त्यांना सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही.

(Image Credit : SBS)

ते म्हणाले की,  रिसर्च दरम्यान हे आढळलं की, सप्लिमेंट्स घेणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. हा एक चिंतेचा विषय आहे. सध्या लोकांची लाइफस्टाईल फार बदलली आहे. ज्या कारणाने लोक संतुलित आहार घेऊ शकत नाहीत आणि आजारी पडतात. यापासून बचाव करण्यासाठी अनेकदा लोक सप्लिमेंट्सचा आधार घेतात, पण हे शरीरासाठी फार घातक ठरू शकतात. यांचा वापर शक्य तेवढा टाळावा.

कॅल्शिअमसोबत व्हिटॅमिन डी घेणं धोकादायक

(Image Credit : The Independent)

साधारण १० लाख लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्च डेटाच्या विश्लेषणातून समोर आले की, व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शिअम घेतल्याने हृदयावर वाईट प्रभाव पडू शकतो. याने शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया वाढते आणि धमण्याही कठोर होतात. अशात व्यक्तीला स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन, ए, बी, सी, डी, ई किंवा अॅंटी-ऑक्सिडेंट व आयर्न घेतल्याने सुद्धा हृदयाच्या आरोग्यावर कोणताही सकारात्मक प्रभाव पडत नाही.

अनेकप्रकारच्या डाएट फेल

(Image Credit : WebMD)

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी कमी चरबी असलेल्या पदार्थांचा सल्ला दिला जातो.  पण डॉ. खान आणि त्यांच्या टिमला कमी चरबीचे पदार्थ खाऊन हृदय निरोगी राहिल्याचं काहीही प्रमाण मिळालं नाही. हृदयासंबंधी समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना लोणी, मांस, चीज इत्यादींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

काही सप्लिमेंट्स फायदेशीर

अभ्यासकांनुसार, फोलिक अ‍ॅसिड आणि माशांमध्ये आढळणाऱ्या ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिडचं सप्लिमेंट हृदयरोगांच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं. फोलिक अ‍ॅसिडमुळे एकीकडे स्ट्रोकचा धोका कमी होतो, तर दुसरीकडे ओमेगा ३ हृदयाच्या अनेक आजारांपासूनही बचाव करतं.

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्यHeart Diseaseहृदयरोग