शरीरातील इतर अवयवांप्रमाणे डोळे हा खूप संवेदनशील अवयव आहे. मात्र डोळ्यांची काळजी घेण्याकडे अनेकांचे लक्ष नसते. व्यस्त जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागतो. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकजण घरून काम करत आहेत. तसंच मोबाईलच्या वापराचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांना धुसर दिसणं, डोळयातून पाणी येणं, डोकेदुखी, चष्मा लागणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
डोळ्यांप्रमाणचे त्वचेसाठीदेखील मोबाईल आणि लॅपटॉपचा लाईट घातक ठरतो. ज्याप्रमाणे उन्हात त्वचेचं नुकसान होतं, तसंच ब्लू लाइटमुळेही त्वचेच्या समस्या उद्भवतात. सतत मोबाईल स्क्रिनचा वापर केल्यामुळे त्वचेवर रिंकल्स, हायपरपिग्मेंटनेशन अशा इतर त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. सध्या अनेकांचे मोबाईलवर तासनतास गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे डोळ्यांचे आजार, स्थूलता, रक्तदाब दिसून आलेले आहे. डोळ्यांची जळजळ होऊन मोतीबिंदू, काचबिंदूसारखे आजार होत आहेत. डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपणार्यांमध्ये निद्रानाश दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून फोन, लॅपटॉप चेहऱ्याच्या अगदी जवळ धरू नका. काही अंतरावर मोबाईलचा वापर करा.
मोबाईलचा वापर करताना रात्री नाईट मोडवर ठेवा. शक्यतो रात्री झोपण्याच्या १ ते दिड तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा. काही सनस्क्रिन आहेत ज्या लाइटपासून त्वचेला होणारं नुकसान कमी करतात. अशा क्रिम्सचा वापर तुम्ही वापर करू शकता.
संतुलित आहार घ्या. रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय असेल तर आजच बंद करा. शक्यतो मोबाईलचा वापर टाळून लवकर झोपल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्वचा आणि डोळ्यांना संरक्षण देईल असा आहार घ्या. जास्तीत जास्त अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा तसंच व्हिटामीन्स प्रोटिन्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
CoronaVirus : 'या' कंपनीच्या लसीच्या चाचणीला मोठं यश ; ९४ टक्के लोकांमध्ये सकारात्मक परिणाम
पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय