अमेरिकन कंपनी मॉडर्नाने नुकतीच घोषणा केली होती की, कोरोना व्हायरसची लस ९४.५ टक्के प्रभावी ठरली आहे. आता मॉडर्नाच्या प्रमुख तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचवता येऊ शकतं. पण व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येणार नाही. मॉडर्नाचे प्रमुख तज्ज्ञ तल जक्स यांनी सांगितले की, ''व्यक्तीला कोरोना व्हायरसं संक्रमण झाल्यास लसीमुळे इतर व्यक्तींपर्यंत व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. चाचणीदरम्यान याबाबत परिक्षण करण्यात आलेले नाही. ''
डेलीमेलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार मॉडर्ना कंपनीच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी सांगितले की, लसीचे प्रभावी रिजल्ट आतापर्यंत दिसून आलेले नाहीत. तसंच मार्डना आणि फायजरची लस कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कितपत परिणामकारक ठरेल याची तपासणी सुरू आहे. एक्स्ट्रजेनका आणि ऑक्सफोर्ड कोरोना लसीच्या चाचण्यांच्या सुरूवातीच्या डेटानुसार या लसी संभाव्य व्हायरसच्या प्रसाराला रोखू शकतात. दरम्यान अजूनही पूर्ण चाचण्या झालेल्या नाहीत.
नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा
मॉडर्नाचे प्रमुख तज्ज्ञ तल जक्स यांनी सांगितले की, ''लस कोरोना झाल्याने आजारी पडण्यापासून वाचवेल की नाही याबाबत चाचणीतून माहिती मिळवणं सुरू आहे. चाचण्यांच्या माहितीद्वारे कळाले की, लस संक्रमित झाल्यानंतर व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. जास्तीत जास्त लसी या मॉडर्नाप्रमाणे तयार करण्यात आल्या आहेत. या लसी फक्त व्हायरसला नष्ट करत नाहीत तर व्हायरसला शरीरातील रिसेप्टर्सशी जोडण्यापासून रोखण्याचे काम करतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आजारी पडण्यापासून वाचतात.
कोरोनाचा कहर रोखला जाऊ शकतो! पण, करावं लागेल एवढं एकच काम; वैज्ञानिकांचा दावा
भारतात सगळ्यात आधी 'या' १ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार
लस उपलब्ध होताच सगळ्यात आधी या लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. द इंडियन एक्सप्रेसने सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लसीचे वितरण, लसीकरण या व्यवस्थेसाठी तज्ज्ञांच्या गटाने एक कोटी लोकांची ड्राफ्ट यादी तयार केली आहे. यासाठी विविध राज्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ९२ टक्के सरकारी रुग्णालयातील माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त ५६ टक्के खासगी रुग्णालयांमधून माहिती पुरवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या एका गटाने दिलेल्या माहितीनुसार आता लस एडवांस स्टेजमध्ये आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून फ्रंटलाईन कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची वेगवेगळ्या गटात विभागणी केली जात आहे.
यात एलोपेथिक डॉक्टर्स, आयुष डॉक्टरर्स, आशा वर्कर्स, एएनएम यांचा समावेश आहे. कारण लस ही संपूर्ण १ कोटी लोकांना दिली जाणार आहे. त्यात प्राथमिकता त्यांना दिली जाणार आहे. लसीकरणा कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी मेडिसिन आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा आणि फॅकल्टी मेंबर्सचा समावेश असेल.