मोमोज हा चायनीज पदार्थ अलिकडे अनेकांच्या पसंतीचा झाला आहे. म्हणजे इतका की, लोक रोज मोमोज खातात. गेल्या काही वर्षात मोमोजची क्रेझ भारतात कमालीची वाढली असून लोक याच्या टेस्टच्या प्रेमात पडले आहेत. त्यात हा पदार्थ स्वस्तात मिळत असल्यानेही याकडे अनेकजण आकर्षित होतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, चवीला छान असणाऱ्या मोमोजमुळे आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्याही होतात. चला जाणून घेऊ काय....
मोमोज तयार करण्यासाठी मैद्याचा वापर केला. मैदा तयार करण्यसाठी गव्हातील हाय फायबरयुक्त भाग वेगळा केला जातो. नंतर याला एजोडीकार्बोनामाइड, क्लोरीनॅगस, बेंजॉइल पेरोक्साइड किंवा अन्य रसायनाच्या माध्यमातून ब्लीच केलं जातं. या केमिकल्समधील अनेक घातक तत्व जे मैद्याला मुलायम आणि क्लीन टेक्स्चर देण्याचं काम करतात ते यात असतात. केमिकल्समुळे पेनक्रियाज द्वारे इन्सुलिन प्रॉडक्टिविटीवर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच हे केमिक्लस इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीसचं कारण देखील ठरतात.
असं अजिबात नाही की, मोमोज खाऊच नये किंवा मोमोज खाणं चुकीचं आहे. पण यांचा फायदा यावर अवलंबून आहे की, मोमोज तयार करणारे कोणत्या प्रकारचा मसाला आणि टेक्निक वापरतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज उपलब्ध आहेत. यातील काही आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत. सामान्यपणे मोमोज तयार करण्यासाठी स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या भाज्या, मांसाचा वापर केला जातो. यामुळे आजार होण्याचा धोका असतो.
होऊ शकता हे आजार
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॅटरिंग अॅन्ड न्यूट्रिशन, पूसाच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, दिल्लीच्या स्ट्रीट फूडवरील समोसे, पाणीपुरी, बर्गर आणि मोमोजमध्ये घातक कोलीफॉर्मचं प्रमाण अधिक असतं. अशाप्रकारे स्ट्रीट फूड खाल्ल्याने डायरिया, टायफॉइड, पोटाची समस्या आणि फूड पॉयजनिंग होऊ शकतं.