Monkey Fever: कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात 'मंकी फीव्हर' वाढत आहे. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, कर्नाटकात मंकी फीव्हरमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या व्हायरलचं इन्फेक्शन आतापर्यंत 49 लोकांना झालं आहे. आरोग्य विभाग ही समस्या दूर करण्यासाठी धडपड करत आहे.
काय आहे मंकी फीव्हर?
NLM वर प्रकाशित एका शोधानुसार, मंकी फीव्हर म्हणजे क्यासानूर फॉरेस्ट डिजीज (KFD) प्राण्यांमधून मनुष्यांमध्ये पसरतो. माकडांच्या शरीरात आढळणारे टिक्स तुटल्याने हा आजार मनुष्यांमध्ये येऊ शकतो. देशात हा आजार वेगाने वाढत आहे. कर्नाटक शिवाय महाराष्ट्र आणि गोव्यातही याच्या केसेस बघण्यात आल्या आहेत.
किती घातक आहे हा आजार?
मंकी फीव्हर मनुष्यांसाठी फार घातक ठरू शकतो. कर्नाटकात या आजाराने दोन लोकांचा जीव घेतला आहे. पहिला मृत्यू 8 जानेवारीला शिवमोग्गा जिल्ह्यातील होसानमगरमध्येझाला. इथे एका 18 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू उडुपी जिल्ह्यातील मणिपालमध्ये झाला.
काय आहेत याची लक्षण?
अचानक ताप येणे, गंभीर डोकेदुखी, उलटी, मांसपेशींमध्ये वेदना, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि थकवा मंकी फीव्हरची काही मुख्य लक्षण आहेत. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, मंकी फीव्हरच्या गंभीर लक्षणांमध्ये नाक आणि हिरड्यांमध्ये रक्त येणे असू शकतात. हे अनेक प्रकारच्या न्यूरोलॉजिकल समस्यांमुळेही होऊ शकतं. अशात यावर लगेच उपाय केले पाहिजे.
कसा कराल बचाव?
मंकी फीव्हरवर असा काही ठोस उपचार नाही. याची लक्षण दिसल्यावर लगेच डॉक्टरांकडे जा. यापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि स्वच्छतेची खूप काळजी घ्या. यासाठी एक वॅक्सिनही आहे. जी घेतल्यावर धोका टळू शकतो.