शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

Monkeypox New Symptoms: मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली ही नवी लक्षणं, कोरोनापेक्षाही अधिक दिवस राहावं लागणार क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 4:04 PM

86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. 71 रुग्णांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचे, तर 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्याचे म्हटले आहे.

करोना महामारीनंतर आता मंकीपॉक्सने (Monkeypox) जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. यातच, एका अभ्यासात मंकीपॉक्सची नवी लक्षणे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यात म्हणण्यात आले आहे, की सध्या मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांत, अशी लक्षणे दिसत आहेत, जी सर्वसाधारणपणे व्हायरसच्या संसर्गाशी संबंधित नाहीत.

महत्वाचे म्हणजे, हा निष्कर्ष (Conclusion) मे आणि जुलै 2022 दरम्यान लंडनमधील (London) मंकीपॉक्सच्या 197 रुग्णांवर आधारलेला आहे. रुग्णांनी सांगितलेल्या काही सामान्य लक्षणांत प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना आणि सूज येण्याचाही समावेश आहे. हे लक्षण पूर्वीपेक्षा वेगळे आहे. या अभ्यासात सहभागी असलेले सर्व 197 लोक पुरुष होते. यांचे सरासरी वय 38 एवढे होते. यांपैकी 196 जण समलिंगी (Gay), उभयलिंगी अथवा जे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात असे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. 

मंकीपॉक्स रुग्णांत दिसून आली नवी लक्षणे - 86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. या आजाराची सर्वात सर्वसामान्य लक्षणे म्हणजे, ताप (62 टक्के), लिम्फ नोड्समध्ये सूज (58 टक्के) आणि स्नायूचे दुखणे (32 टक्के) होय. या अभ्यासत सहभागी असलेल्या 71 रुग्णांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखणे, 33 जणांनी घसा खवखवणे आणि 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्यासंदर्भात सांगितले. 

याच बरोबर, 27 रुग्णांच्या तोंडात जखमा होत्या. 22 रुग्णांना शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर एकच जखम दिसून आली आहे. तसेच, 9 रुग्णांना टॉन्सिलची सूज आली होती. संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे, एकच जखम आणि टॉन्सिलची सूज, ही या पूर्वी मंकीपॉक्सची विशिष्ट लक्षणे म्हणून ओळखली जात नव्हती. एवढेच नाही, तर जवळपास एक तृतियांश (36 टक्के) रुग्ण एचआयव्ही संक्रमितही होते आणि 32 टक्के लोकांत लैंगिक संक्रमणही झालेले होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडLondonलंडन