शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

Monkeypox outbreak: 'मंकीपॉक्सपासून बचावासाठी लसीकरणाची गरज नाही, पण...', WHOचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 6:14 PM

Monkeypox outbreak: अमेरिका आणि यूरोपमध्ये मोठ्या संख्येने मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत.

Monkeypox outbreak: जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना (WHO) या आजाराबाबत सतर्क झाली आहे. WHO ने नुकतीच एक नवीन चेतावणी जारी केली असून त्यात म्हटले आहे की, मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनासारख्या लसीकरण कार्यक्रमाची गरज नाही, परंतु सुरक्षित संभोग आणि स्वच्छतेची काळजी घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते.

मंकीपॉक्ससाठी लसीकरण आवश्यक नाहीजागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी त्वरित लस पुरवठा आणि विषाणूविरोधी उपचारांची आवश्यकता नाही. WHO कडून हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा US CDC ने सांगितले आहे की, त्यांनी मांकीपॉक्स आणि चेचक यांच्या उपचारांसाठी JYNNEOS लसीची लस जारी केली आहे. मंकीपॉक्स प्रथम आफ्रिकेत 1958 मध्ये आढळून आला, त्यानंतर हा रोग एंडेमिक घोषित करण्यात आला.

अमेरिकेत या विषाणूचा रुग्णमंकीपॉक्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत 18 मे रोजी आढळून आला होता. मॅसॅच्युसेट्समध्ये राहणारी पीडित तरुणी नुकतीच कॅनडाला गेली होती. अमेरिकेत मंकीपॉक्सच्या प्रतिबंधासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाही ही लस दिली जात आहे. यासोबतच कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांनाही लसीकरण करण्यात येत आहे.

ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लागणअमेरिका आणि युरोपमध्ये मंकीपॉक्सची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणीही आफ्रिकेला गेले नव्हते. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, व्हायरसच्या प्रसाराची नेमकी कारणे अद्याप सापडलेली नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे, या विषाणूचे वेगाने उत्परिवर्तन झाल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

युरोपमधील डब्ल्यूएचओच्या पॅथोजेन थ्रेट टीमचे सदस्य रिचर्ड पेबोझी म्हणाले की, विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन आवश्यक आहे. मंकीपॉक्स लसीचे दुष्परिणाम यापूर्वीच समोर आले आहेत. सर्वच नाही, पण बहुतांश घटनांमध्ये पुरुषाचे पुरुषाशी संबंध असल्याने हा आजार पसरला आहे. रोगाच्या प्रतिबंधासाठी वारंवार लैंगिक तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यAmericaअमेरिका