नवी दिल्ली : देशात मंकीपॉक्सचे एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. अनेक रुग्णांचा परदेश दौऱ्याची कोणतीही हिस्ट्री सुद्धा नाही, हे एक चिंतेचे कारण आहे. अशा स्थितीत मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जेवढा वाटला होता, त्यापेक्षा जास्त पसरल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, केरळमधून एकूण 5 आणि दिल्लीमधून 3 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी केरळमधील पाचवा रुग्ण यूएईच्या दौऱ्यावरून आला आहे, ज्याचे वय 35 वर्षे आहे. तसेच, मंकीपॉक्समुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केरळ राज्य सरकारने सोमवारी दिली आहे.दिल्लीत तीन रुग्ण समोर आले, त्यापैकी एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मात्र, दिल्लीत रुग्णलयात दाखल झालेल्या नवीन रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा परदेश प्रवासाची हिस्ट्री नाही. दोन लोक नायजेरियन वंशाचे असून ते दिल्लीत दीर्घकाळापासून राहतात. त्यापैकी एक हॉटेलमध्ये काम करतो. मात्र, हे दोन्ही लोक एका आफ्रिकन व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याशिवाय एका महिलेला दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जास्त सतर्क राहण्याची आश्यकताया महिलेचेही परदेश दौऱ्याची कोणतीही हिस्ट्री नाही आहे. याचा अर्थ लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण देशात अशी प्रकरणे आहेत की मंकीपॉक्स कुठून आला, हे शोधणे कठीण जात आहे. म्हणजेच देशात अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यांना मंकीपॉक्स आहे, पण ते सरकारच्या रडारवर नाहीत. विशेष म्हणजे, केरळमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंकीपॉक्स जीवघेणा ठरू शकतो की काय अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. पण रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीला व्हायरल एन्सेफलायटीस झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीमधील मल्टी ऑर्गन क्लिअर झाले.
आयसोलेशनमध्ये राहण्याची गरजलोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असेल, त्याला कर्करोगासारखा आजार असेल किंवा त्याला इतर अतिशय जुनाट आणि गंभीर आजार असतील, तर मंकीपॉक्स धोकादायक ठरू शकतो. अन्यथा, सामान्य प्रकरणांमध्ये, रुग्ण जास्तीत जास्त 21 दिवसांत बरा होतो. पण, या 21 दिवसांमध्ये रुग्ण आयसोलेशनमध्ये राहिला पाहिजे.