ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसची लागण झालेले लोक, कुणा-कुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेणे येथील सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांना अत्यंत कठीण जात आहे. कारण अनेक लोकांचे क्रुझिंग ग्राउंड, सेक्स क्लब आणि केमेक्स सेशन दरम्यान अनेक अज्ञात लैंगिक जोडीदार असतात, असे एका रिपोर्टमध्ये म्हण्यात आले आहे. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, यूके हेल्थ अँड सेफ्टी एजन्सीने (यूकेएचएसए) आजारासंदर्भात दिलेल्या पहिल्या टेक्निकल ब्रिफिंगमध्ये, 45 पुष्टी झालेल्या प्रकरणांच्या माहितीचा समावेश आहे. ज्यात त्यांच्या त्यांच्या लैंगिक आरोग्यासंदर्भात विचारण्यात आले होते.
लैंगिक संबंधांमुळे पसरतोय व्हायरस?संबंधित रिपोर्टमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात येत असलेल्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जवळपास सर्वच (98 टक्के) प्रकरणांमध्ये इनक्युबेशन पिरयड दरम्यान इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्या गेल्याची नोंद झाली आहे. यांपैकी जवळपास अर्ध्या म्हणजेच (44 टक्के) लोकांनी गेल्या तीन महिन्यांत 10 हून अधिक लैंगिक भागीदारांसोबत आणि सामूहिक सेक्स केल्याचे नोंदवले आहे.
याच बरोबर, 45 पैकी 20 जणांनी 'सेक्स-ऑन-प्रिमायसेस' मध्ये भाग घेतल्याचेही म्हटले आहे. जसे सौना, डार्क रूम अथवा यूके अथवा परदेशात सेक्स क्लबमध्ये इन्क्यूबेशन पिरियड दरम्यान. तर जवळपास 64 टक्के लोकांनी डेटिंग अॅपच्या माध्यमाने नव्या जोडिदारांना भेटले, असेही या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण - ब्रिटनमध्ये गेल्या 12 जूनपर्यंत यूकेएचएसएने मंकीपॉक्सची लागण झालेले 104 अतिरिक्त रुग्ण शोधून काढले आहेत. यामुळे आता येथील एकूण रुग्णांची संख्या 470 वर पोहोचली आहे. यात इंग्लंडमध्ये 452, स्कॉटलँड मध्ये 12, उत्तर आयरलंडमध्ये दोन आणि वेल्स मध्ये चार जणांचा समावेश आहे.