Monsoon Health Tips : पावसाला हळूहळू का होईना सुरूवात झाली आहे. पाऊस आला की, उकड्यापासून सुटका मिळते. पण सोबतच पावसाळ्यात वेगवेगळे आजारही डोकं वर काढतात. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, डायरिया असे आजार वाढतात. अशात या दिवसात तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात सगळ्यात जास्त आजार बाहेरचं खाऊनच पसरतात. त्यामुळे तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या.
एक्सपर्ट सांगतात की, या वातावरणात नेहमीच पाणी उकडून प्यावं. असं केल्याने पाण्यात बॅक्टेरिया नष्ट होतात. त्याशिवाय रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने नुकसानकारक विषाणु शरीरातून बाहेर निघतात.
मीठ कमी खा - पावसाळ्यात आहारातून मिठाचं सेवन कमी केलं पाहिजे. शरीरात मीठ सोडिअम वाढवण्याचं काम करतं. जे पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशरचं कारण बनतं. हायपरटेंशन, कार्डियोवस्क्यूलर डिजीज आणि डायबिटीसच्या रूग्णांनीही मिठाचं सेवन कमी करावं.
सीजनल फळे खा - या दिवसांमध्ये सीजनल फळांचं सेवन करावं. पावसाळ्यात जांभळं, पपई, बोरं, डाळिंब आणि पेर यांचं सेवन करावं. या फळातील तत्व शरीराला इन्फेक्शन आणि आजारांपासून वाचवतात.
पुरेशी झोप घ्या - मॉन्सूनमध्ये आपण इम्यूनिटी बूस्ट करणारे फळं खावेत. यात तुम्ही भोपळा, ड्राय फ्रुट्स, व्हेजिटेबल सूप, रताळे यांचंही सेवन करावं. त्यासोबतच रोज 7 ते 8 तासांची झोप घ्यावी.
बाहेरचं खाणं टाळा - पावसाळ्यात थंड वातावरणामुळे बाहेरचे गरमागरम पदार्थ खाण्याचं खूप मन होतं. पण जर तुम्हाला तब्येत बिघडू द्यायची नसेल तर या दिवसात बाहेरचं काहीही खाणं टाळलं पाहिजे.
कच्च खाणं टाळा - पावसाळ्यात काही कच्चं खाणं टाळलं पाहिजे. या दिवसात मेटाबॉल्जिम फार हळूवार काम करतं. ज्यामुळे अन्न पचनाला वेळ लागतो. या दिवसात बाहेरचा ज्यूस आणि सलाद खाणंही टाळा. जास्त वेळ कापून ठेवलेले फळंही खाऊ नयेत.