(Image Credit : curiosity.com)
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, डोकेदुखीचा त्रास झाल्यावर कॉफीचं सेवन केल्याने आराम मिळतो. पण एका रिसर्चमधून हा समज खोटा ठरवण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला आहे की, कॉफीचं अधिक सेवन केल्याने मायग्रेनची समस्या होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दिवसातून तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफीचं सेवन केल्याने मायग्रेनचा धोका वाढू शकतो. अमेरिकेतील बेथ इज्राइल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये अभ्यासकांनी मायग्रेन आणि कॅफीनयुक्त पेय यातील संबंधाचा अभ्यास केला.
(Image Credit : www.valparaisochiropractor.com)
हॉर्वर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एलिजाबेथ मोस्तोफस्की यांच्या टीमला आढळलं की, ज्या लोकांना कधी कधी मायग्रेनची तक्रार होते, त्यांना एकदा किंवा दोनदा कॅफीनयुक्त पेय पदार्थांचं सेवन केल्याने त्या दिवशी डोकेदुखी झाली नाही. तीन कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफी सेवन केल्याने त्यांना त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डोकेदुखी झाली.
हे सुद्धा आहे कारण
(Image Credit : dunyanews.tv)
मोस्तोफस्की म्हणाल्या की, पूर्ण झोप न घेण्यासोबतच इतरही कारणांमुळे मायग्रेनचा धोका वाढू शकतो. पण कॅफीनची भूमिका विशेष रूपाने अडचणीची आहे. कारण एकीकडे याने डोकेदुखीचा धोका वाढतो, तर दुसरीकडे याने डोकेदुखीवर नियंत्रण करण्यातही मदत मिळते.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञ सांगतात की, तुम्हाला जर कधी मायग्रेनचा त्रास झाला आणि उपचारासाठी तुमच्याकडे कोणतही औषध नसेल तर कॉफीचं सेवन करणे टाळा. कारण कॉफीने तुम्हाला भविष्यात फार नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञ सांगतात की, डोकेदुखी दूर करण्यासाठी कॉफी सेवन करण्याऐवजी नॅच्युरल थेरपीचा वापर करावा.
मायग्रेनची समस्या काय आहे?
(Image Credit : hmccentre.com)
मायग्रेन ही डोकेदुखीची एक गंभीर समस्या आहे. सामान्यपणे यात अर्ध डोकेदुखी होते आणि थांबून थांबून डोकं दुखतं. कधी कधी पूर्ण डोकंही दुखतं. हा त्रास २ तासांपासून ते ७२ तासांपर्यंत कायम राहतो. अनेकदा वेदना सुरू होण्याआधी रूग्णाला संकेतही मिळतात. ज्याद्वारे त्यांना वेदना होणार याची कल्पना आलेली असते.
या संकेतांना 'ऑरा' असं म्हटलं जातं. मायग्रेनला थ्रॉबिंग पेन इन हेडॅक असंही म्हटलं जातं. यात जणू डोक्यावर हातोडा मारल्यासारखी जाणीव होते. ही वेदना इतकी तीव्र असते की, व्यक्ती काही वेळासाठी काहीच करू शकत नाही. अनेकांमध्ये मायग्रेनची समस्या ही आनुवांशिक असते. तसेच ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळते.