(Image Credit : www.self.com)
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांच्या मनात नेहमीच वेगवेगळे प्रश्न असतात. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या वेळी एक्सरसाइज केल्याने वजन कमी होतं? अनेकजण ऑफिसमधून परतल्यावर जिमला जातात. मात्र, असं करून त्यांचं वजन कमी होत नसल्याची ते तक्रार करतात. अशात एक्सरसाइजच्या वेळेबाबत एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.
(Image Credit : www.besthealthmag.ca)
या रिसर्चनुसार, सकाळी एक्सरसाइज करणाऱ्यांचं वजन अधिक कमी होतं. जर तुम्ही दिवसाच्या इतर वेळी जेवढी एक्सरसाइज करता, तेवढीच इतर व्यक्ती सकाळी करत असेल तर त्या व्यक्तीला वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो.
(Image Credit : www.healthline.com)
या रिसर्चमधून हे समजून घेण्यास मदत मिळाली की, काही लोकांचं नियमित एक्सरसाइज करूनही हवं तसं वजन कमी का होत नाही. या रिसर्चमध्ये साधारण १०० ओव्हरवेट लोकांचा समावेश करण्यात आला. हे लोक याआधी कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करत नव्हते. या सगळ्यांना आठवड्यातून ५ वेळा एका लॅबमध्ये येऊन एक्सरसाइज करण्यास सांगण्यात आले. त्यांना ६०० कॅलरी बर्न करेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या एक्सरसाइज करायच्या होत्या.
(Image Credit : www.runtastic.com)
साधारण १० महिन्यांनंतर सर्वच सहभागी लोकांचं वजन कमी झालं, पण यात फार फरक होता. जेव्हा अभ्यासकांनी याचं कारण समजलं नाही तेव्हा त्यांनी लोकांच्या एक्सरसाइजच्या वेळेवर लक्ष दिलं. सर्वच सहभागी लोक सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कधीही एक्सरसाइजसाठी येऊ शकत होते. अशात असं आढळलं की, जे लोक दुपारी एक्सरसाइज करत होते, त्यांचं वजन सकाळी एक्सरसाइज करणाऱ्यांपेक्षा कमी घटलं होतं.