(Image Credit : blog.mypacer.com)
हाडांचं दुखणं आणि सुस्ती येणं ही हिवाळ्यात सामान्य समस्या आहे. ही समस्या उन्हाच्या कमतरतेमुळे होते. हिवाळ्यात उन्हाचे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात आणि या समस्यांपासून आपला बचाव करतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, हिवाळ्यात उन आरोग्यासाठी चांगली असते. या रिसर्चनुसार, आठवड्यातून तीन दिवस सकाळी सकाळी २० ते ३० मिनिटे उन्हात फिरल्याने शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होते.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फेटचा स्तर नियंत्रित ठेवण्यासोबतच त्यांच्या वापराची क्षमताही ठरवते. हाडांना, मांसपेशींना आणि दातांना मजबूती देण्यासोबतच याने रोगांशी लढण्याची ताकदही मिळते. हेच कारण आहे की, व्हिटॅमिन डी च्या कमरतेमुळे व्यक्तीला सतत सर्दी-पळसा, ताप येतो. इककेच नाही तर त्यांचे जखमांचे घावही उशीरा भरतात आणि सतत सुस्ती, थकवा आणि कमजोरी जाणवते.
व्हिटॅमिन डी ची कमतरता भारतात एक सामान्य समस्या झाली आहे. ज्यामुळे आज कमी वयातही लोकांनी हात-पाय आणि सांधेदुखी, अंगदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागतोय. यावर वेळीच उपाय न केल्याने किंवा दुर्लक्ष केल्याने ऑस्टियोपोरोसिससारखा हाडांचा आजारही होण्याचा धोका वाढतो. या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी सकाळी कमी उन्हात फिरायला जावे. याने तुम्हाला हिवाळ्यात हेल्दी राहण्यासही मदत मिळेल.