पावसाळ्यात सर्वच ठिकाणी ओलावा आणि दमट हवामानामुळे गंभीर आजरांची लागण होऊ शकते. तुमचा विश्वास बसणार नाही पण सगळ्यात घातक किटकांमध्ये डासांचा समावेश होतो. डास चावल्यामुळे मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. सध्या आधीच कोरोनाची भीती असताना जर डासांमुळे तुम्ही आजारी पडला तर आरोग्याचं नुकसान होऊन तुमची मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला डास चावल्यामुळे कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागतो याबाबत सांगणार आहोत.
चिकनगुनिया
चिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणू मुळे होणारा आजार आहे. चिकनगुनिया चे व्हायरस रुग्णाच्या शरीरातून डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात. हा आजार बराचसा डेंगू सारखा आहे. या दोन्ही आजारांचे विषाणू ‘एडिस’ ह्या जातीच्या डासांमुळे पसरतात. डासांपासून दूर राहिल्यास या आजारांपासून दूर राहता येईल.
येल्लो फीवर
येल्लो फिवरमध्ये अनेकदा कावीळीची लक्षणं दिसून येतात. त्यामुळेच याला येल्लो फिवर असं म्हणतात. यामध्ये त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. अनेक रूग्णांमध्ये कंबरदुखी, उलट्या आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं दिसून येतात. चिकनगुनिया हा देखील डासांमुळे होणारा आजार आहे. यामध्ये पीडित व्यक्तीला संपूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेदना जाणवतात. जर चिकनगुनिया एखाद्या व्यक्तीला झाला तर संपूर्ण बरं होण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो. तसेच या आजाराची लक्षणं म्हणजे, डोकेदुखी, चक्कर येणं आणि उलट्या होणं.
एडीज डांसाचे संक्रमण झाल्यामुळे डेंग्यू हा आजार पसरतो. या आजारात रक्तात झपाट्याने संक्रमण पसरत जातं. या आजारासाठी कोणतीही इंजेक्शन किंवा औषध उपलब्ध नाही. या आजारासाठी सामान्य तापाची औषध दिली जातात. आजारी व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला जातो.
मलेरिया
ताप आणि थंडी वाजणं, तसंच श्वास घेण्यास त्रास होणं, ही मलेरियाची गंभीर लक्षणं आहेत. मलेरिया प्लास्मोडियम परजीवीमुळे होणारा प्राणघातक रक्त रोग आहे. मलेरियांच्या डासांचा आवाज येत नाही. घरात डास उत्पन्न होण्याची ठिकाणं नष्ट करणे, रात्री मच्छरदाणीचा वापर करणे हे काही साधे उपाय आपल्याला मलेरियापासून पासून दूर राहू शकता.
झिका
डास चावल्याने होणाऱ्या गंभीर आजारांमध्ये झिका व्हायरसचाही समावेश होतो. हा आजार वाढल्याने व्यक्तीला जीवही गमवावा लागू शकतो. झिका वायरसची लागण झाल्यानंतर सुरुवातीला काही खास लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे या आजाराबाबात समजणं फार कठिण असतं. डोळे लाल होणं, ताप येणं, सांधेदुखी ही लक्षणं आहेत. गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी हा आजार जास्त धोकादायक आहे. कारण या व्हायरसमुळे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आईसोबतच तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरही परिणाम होतो.
डासांपासून वाचण्यासाठी उपाय
डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.
लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता. याने तुम्हाला डास चावणार नाहीत.
घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो.
दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.
कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो.
सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याला तुमच्या 'या' ५ सवयी ठरतात कारणीभूत
पावसाळयात थंडी वाजून ताप येणं, 'या' गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण;आधीच जाणून घ्या उपाय