(Image Credit : evlilikhazirlik.com)
जगभरात बदलत्या लाइफस्टाइल आणि बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार आपलं डोकं वर काढत आहेत. सतत लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. असाच एक भारतात वाढत असलेला आजार म्हणजे हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. पण त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे भारतातील केवळ ४५ टक्के लोकांनाच हाय ब्लड प्रेशरचा सामना कसा करायचा हे माहीत आहे.
देशभरात करण्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. हा सर्व्हे १५ ते ४९ वयोगटातील ७ लाख ३१ हजार ८६४ लोकांवर करण्यात आला. यात २९ राज्य आणि ७ केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. सर्व्हेनुसार, हाय ब्लड प्रेशरचे सर्वात कमी म्हणजे ६१.३ टक्के रूग्ण मध्य प्रदेशात आहेत तर सर्वात जास्त ९३.५ टक्के रूग्ण हरयाणामध्ये आहेत.
४ पैकी ३ लोकांनी बीपी कधीच तपासला नाही
PLOS जर्नलमध्ये प्रकाशित सर्व्हेनुसार, भारतात दर ४ पैकी ३ व्यक्ती असे आहेत, ज्यांनी कधीही ब्लड प्रेशर मोजलं नही. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीयांना हे माहीत नाही की, त्यांना हायपरटेंशनची समस्या आहे की, नाही. ४५ टक्के असे रूग्ण आहेत, जे हाय ब्लड प्रेशरचे शिकार झाले आहेत. १३ टक्के रूग्ण वर्तमानात हाय बीपी दूर करण्यासाठी औषधे घेत आहेत. तसेच ८ टक्के असे आहेत ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रित आहे.
सर्वात जास्त जागरूकता कुठे आणि कुठे कमी
१५ ते १९ वयोगटातील ५.३ टक्के परूष आणि १०.९ टक्के महिलांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित आढळला. कारण यातील जास्तीत जास्त लोकांचा बीपी सामान्य आहे. किंवा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत आहेत. हाय बीपीबाबत जागरूकतेचा स्तर सर्वात कमी छत्तीसगढ(२२.१ टक्के) आणि सर्वाधिक पुद्दुचेरी(८०.५ टक्के) आहे.
हाय बीपी कंट्रोल करणे कठिण नाही
या सर्व्हेतून समोर आलं आहे की, देशभरात हायपरटेंशन नियंत्रित करण्याचा स्तर १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या रिसर्चमध्ये हायपरटेंशन रोखणे आणि जागरूक करण्याचे प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या रिसर्चशी संबंधित डॉ. दोराईराज प्रभाकरन यांनी सांगितले की, 'हायपरटेंशनची माहिती मिळवणे आणि त्यावर उपचार करणे सोपं आहे. त्यामुळे याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. याला कंट्रोल करून स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका थांबवला जाऊ शकतो'.
(Image Credit : Healthline)
ग्रामीण भागात काय स्थिती?
हा रिसर्च पब्लिक हेल्थ फाउंडेशन, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बरमिंगघम यूनिव्हर्सिटी, गोटिनजेन विश्वविद्यालय आणि हिडेबबर्ग इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ यांनी मिळून केला. रिसर्चमध्ये आढळलं की, ग्रामीण भागांमध्ये राहणारे लोक स्वत:ची काळजी घेण्यात कमी पडत आहेत.