(Image credit : Be Brain Fit)
बदलणारी लाइफस्टाइल, स्पर्धेचं युग आणि काम करण्याच्या पद्धतीने माणसांना मल्टी टास्किंग होण्यासाठी भाग पाडले आहे. अनेक ठिकाणी तर मल्टी टास्किंग जॉब करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मल्टी टास्किंग तसं पाहायला गेलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. सध्या मल्टी टास्किंग स्टाफची मागणीही वाढत आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी प्रत्येक कंपनी आटापिटा करत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक लोक आपल्या लाइफमध्ये मल्टी टास्किंग होऊ लागले आहेत. परंतु या सर्व गोष्टींमुळे मल्टी टास्किंग व्यक्तींच्या आरोग्यावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. जाणून घेऊया मल्टी टास्किंग असल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत...
मेंदूवर होतो परिणाम
काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांवरून मीडिया मल्टी टास्कर्सच्या डोक्यामध्ये हळूहळू ग्रे मॅटर कमी होत जातं. त्यामुळे बौद्धिक नियंत्रण क्षमता, भावनांवरील पकड आणि इच्छा शक्ती कमजोर होऊ लागते.
स्मरणशक्ती कमजोर होते
2016मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून एक गोष्ट समोर आली की, क्रॉनिक मीडिया मल्टीटास्कर्सची वर्किंग मेमरी म्हणजेच एखाद्या कामादरम्यान संबंधित माहीती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि लॉन्ग-टर्म मेमरी म्हणजेच घटना आणि माहिती बराच वेळ लक्षात ठेवण्याची क्षमता कमजोर होते.
आभास होण्याची समस्या
एका संशोधनानुसार, संशोधकांनी सात दिवसांपर्यंत मल्टी टास्किंग करणाऱ्या काही लोकांच्या घरी राहून त्यांचं निरिक्षण केलं, त्यांना असं दिसून आलं की, एखादी व्यक्ती जितकी जास्त मल्टीटास्किंग करते तेवढीचं तिच्या मनस्थितीमध्ये फरक दिसून येतो. एका मर्यादेनंतर त्यांच्या आभासमध्ये वाढ होते आणि त्यांना आवश्यक कामांसोबतच अनावश्यक कामांमधील फरक ओळखू शकत नाहीत. याशिवाय एक काम करताना मध्येच दुसरं काम करणं, विसरणं, चुका करणं यांसारख्या चुका करू लागतात.
मल्टी टास्किंगमुळे होऊ शकतात दुर्घटना
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु मागील काही दिवसांमध्ये जेव्हा न्यूयॉर्क शहरामध्ये जवळपास 1400 पायी चालणाऱ्या लोकांचा कार अॅक्सिडंट झाल्याची कारणं तपासण्यात आली त्यामागेही मल्टीटास्किंगचीच क्रेझ असल्याचे सिद्ध झाले. त्यातून असं समजलं की, 10 टक्के व्यक्तींच्या तुलनेमध्ये 20 टक्के तरूण मुलं पायी चालत असूनही दुर्घटनेची शिकार झाली होती. कारण त्यांचं संपूर्ण लक्ष मोबाइलमध्येच होतं. त्यामुळे पडणं, फ्रॅक्चर होणं यांसारख्या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या होत्या.
पार्टनर आणि परिवाराच्या संबंधांवर परिणाम
एका साधारण समजानुसार, स्मार्टफोनमुळे नात्यांमधील , व्यक्तींमधील अंतर फार कमी झालं आहे. परंतु यामागे लपलेलं एक सत्य या संशोधनामधून समोर आलं. ज्यामध्ये दिलेल्या आकड्यांनुसार, हे स्पष्ट झालं की, स्मार्टफोनमुळे संबंध सुधारण्याऐवजी बिघडत आहेत. संशोधनाच्या भाषेमध्ये या समस्यांना टेक्नोफ्रेंकेस असं नाव देण्यात आलं आहे.