(प्रातिनिधीक फोटो)
कोरोनाच्या माहामारीने देशभरात हाहाकार पसरवला आहे. आत्तापर्यंत देशातील लोक व्हायरसच्या संक्रमणाने हैराण झाले होते. लॉकडाऊन केल्यामुळे लोकांची कामं पूर्णपणे बंद असून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाची माहामारी कधी आटोक्यात येणार याच्या प्रतिक्षेत लोक आहेत. आता देशात कोरोना व्हायरसपेक्षाही गंभीर स्वरुपाच्या आजाराने शिरकाव केला आहे.
या आजाराचा पहिला रुग्ण गुजरातमधील सुरतमध्ये आढळून आला आहे. सुरतमधील एका लहान मुलामध्ये या गंभीर आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. या आजाराचं नाव मल्टी सिस्टीम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) असे आहे. या आजाराला MIS-C असंही म्हटलं जातं.सुरतच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसून आल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
सुरतध्ये वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील १० वर्षीच्या मुलाच्या शरीरात MIS-C म्हणजेच मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. विशेष म्हणजे हा आजार आतापर्यंत अमेरिका, युरोपीय देशातात मोठ्या प्रमाणावर पसरत होता. या आजारानेग्रस्त असलेल्या मुलाला सुरतच्या एका रुग्णालयात भरती केलं. याआधी उलट्या, खोकला, अतिसार, ओठ आणि डोळे लाल होणं अशा समस्या उद्भवत होत्या. सुरतच्या डॉ. आशिष गोटी यांनी या मुलाला तपासले त्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला.
तपासणीदरम्यान चाचणी केल्यानंतर दिसून आले की या मुलामध्ये मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं आहेत. या गंभीर आजारामुळे संक्रमित लहान मुलांच्या हृदयाचे पंपींग ३० टक्क्यांनी कमी होते. शरीरातील नसांना सुज येते. गंभीर स्थितीत हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. सात दिवसांच्या उपचारांनंतर या मुलाला घरी सोडण्यात आलं आहे. या आजाराची लागण ३ ते २० वर्षाच्या मुलांना होते. या आजारावर उपाय म्हणून उलट्या, खोकला, अतिसार, ओठ आणि डोळे लाल होणं अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित मुलांची तपासणी करून घ्या.
दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस
आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत