केरळमध्ये 'मम्प्स' या व्हायरल इन्फेक्शनचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या 2,505 झाली आहे. केरळमध्ये अवघ्या 2 महिन्यांत याची 11 हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केरळमध्ये वाढत्या मम्प्स इन्फेक्शनबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तसेच आरोग्य विभागाने या आजारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याची लक्षणे आणि इन्फेक्शन झाल्यानंतर प्रथम काय करावे हे जाणून घेऊया.
मम्प्स व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय?
ओन्ली माय हेल्थच्या मते, मम्प्स हा व्हायरल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये तो गालांच्या काठावर लाळ असलेल्या पॅरोटीड ग्लँडवर घातक परिणाम करतो. या इन्फेक्शनमुळे गाल सुजतात आणि चेहराही वेगळा दिसतो. मम्प्स इन्फेक्शनमुळे मानेमध्ये तीव्र वेदना होतात. हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतं. पण लहान मुलांना याचा जास्त धोका असतो.
मम्प्सची ही आहेत लक्षणं
या आजाराची लक्षणे 2-3 आठवड्यांत शरीरावर दिसतात.
- गिळण्यास अडचण येते
- घसा कोरडा पडतो
- ताप
- डोकेदुखी
- स्नायू दुखणे
- जेवण जात नाही
- सर्व वेळ थकवा जाणवतो
- चेहऱ्याच्या बाजूला गालाजवळील ग्लँडला सूज
अशी घ्या काळजी
मम्प्स रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लस. MMR ही लस सामान्यतः मुलांना दोन डोसमध्ये दिली जाते. पहिली 9 महिन्यांच्या वयात आणि दुसरी 15 महिन्यांच्या वयात आणि बूस्टर डोस 4-6 वर्षांच्या वयात दिला जातो. ती सहज उपलब्ध आणि परवडणारी आहे. ही लस केवळ मम्प्सपासूनच नाही तर गोवर आणि इतर आजारांपासूनही संरक्षण करते.