जगातल्या जास्तीत जास्त देश सध्या कोरोना व्हायरसच्या घातक महामारीचा सामना करत आहेत. अशात कॅनडामध्ये एका रहस्यमय आजराची दहशत पसरली आहे. आतापर्यंत असे ४८ संक्रमित रूग्ण आढळले, ज्यांना झोप न येणे, शरीर गळून जाणे आणि भ्रम होणे अशी लक्षणे दिसत आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या रहस्यमय आजाराचे रूग्ण अटलांटिक तटावर असलेल्या कॅनडाच्या न्यू ब्रंसविक प्रांतात आढळले आहेत. या लोकांना स्वप्नात मृत लोक दिसत आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. हा आजार नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी कॅनडातील अनेक न्यूरोलॉजिस्ट दिवसरात्र काम करत आहेत.
काय आहे आजार पसरण्याचं कारण?
वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, हा आजार सेलफोन टॉवर्सच्या रेडीएशनमुळे पसरत आहे. तर काही वैज्ञानिक या आजारासाठी कोरोना वॅक्सीनला दोष देत आहेत. पण त्यांच्या या दाव्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
सहा लोकांचा मृत्यू
वैज्ञानिकांनी सांगितलं की, हा आजार कॅनडामध्ये आजपासून ६ वर्षाआधी पसरणं सुरू झालं होतं. अनेक लोक या आजाराचे शिकार होत आहेत. त्यातील सहा लोकांचा मृत्यूही झाला आहे. पण गेल्या १५ महिन्यापासून कोरोना व्हायरस महामारीचा कहर सुरू झाला. ज्यामुळे लोकांचं आणि आरोग्य अधिकाऱ्यांचं लक्ष या आजारावरून हटलं होतं. पण याकडे दुर्लक्ष होणं मोठी चूक ठरत आहे.
वैज्ञानिकांकडेही नाही उत्तर
या रहस्यमय आजाराने सहा लोकांचा जीव गेला असूनही वैज्ञानिकांना या आजाराचं नावही माहीत नाही. लोक सतत प्रश्न विचारत आहेत की, हा आजार पर्यावरणातून पसरत आहे का? की हा आजार आनुवांशिक आहे? किंवा मासे किंवा हरणाचं मांस खाल्ल्याने हा आजार पसरत आहे? मात्र, या प्रश्नांची वैज्ञानिकांकडे काहीच उत्तरे नाहीत.
या रहस्यमय आजाराची सूचना जनतेला मार्चमध्ये देण्यात आली होती. न्यू ब्रंसविकचे मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी एका प्रेस रिलीजमधून या आजाराची माहिती दिली होती. डॉक्टरांचं मत आहे की, यावरून हे दिसून येतं की, विज्ञानात असाधारण प्रगती केल्यावरही अजूनही मानसिक रोग किंवा न्यूरोसंबंधी आजारांची माहिती मिळवण्यात आपण खूप मागे आहोत.