शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

corona virus : जीवघेण्या कोरोना व्हायरसबाबतचे गैरसमज, जाणून घ्या काय आहे सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 10:41 AM

जगभरात पसरत असलेल्या या व्हायरसबाबत लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गैरसमजही आहेत.

(Image Credit : pharmaceutical-technology.com)

सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत चीन याने ४२५ लोकांची जीव गेलाय. २३ देशांमध्ये या व्हायरसने डोकं वर काढलं असू २० हजारपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. असात या व्हायरसमुळे लोकांमध्ये वेगवेगळे गैरसमज पसरले आहेत. भारतातही कोरोना व्हायरसच्या तीन केसेस समोर आल्या आहेत. 

जगभरात पसरत असलेल्या या व्हायरसबाबत लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गैरसमजही आहेत. कुणी म्हणतंय होमिओपॅथीने यावर उपचार होऊ शकतात तर कुणी म्हणतंय आयुर्वेदिक उपायाने हा व्हायरस नष्ट होईल. सोशल मीडियात कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे गैरसमज पसरवले जात आहेत. चला जाणून घेऊ काही समज काही गैरसमज...

गैरसमज - लसूण खाल्ल्याने नष्ट होईल कोरोना व्हायरस

सत्य - सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर अशाप्रकारचे मेसेज शेअर केले जात आहेत. ज्यात दावा करण्यात येतो आहे की, लसणाचं सेवन केल्याने कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. लसूण एक हेल्दी फूड नक्कीच आहे, पण याचा काहीच पुरावा नाही की, याने कोरोना व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. 

गैरसमज - निमोनियाच्या लसीने कोरोना व्हायरसपासून बचावास होते मदत

सत्य - ही बाब सुद्धा पूर्णपणे चुकीची आहे. WHO ने हे सांगितलेलं आहे की, निमोनियासाठी दिली जाणारी न्यूमोकॉकल वॅक्सीन कोरोना व्हायरससोबत लढू शकत नाही. हा एक नवा व्हायरस असून यासाठी नविन वॅक्सीन तयार करावी लागेल. सध्या वैज्ञानिक त्यावरच रिसर्च करत आहेत.

गैरसमज - गायीचं शेण आणि गोमूत्राच्या सेवनाने कोरोना व्हायरसवर उपचार 

सत्य - कोरोना व्हायरस समोर आल्यावर लोक वेगवेगळा दावा करण्यात येतो आहे की, गायीचं शेण आणि गोमूत्राचं सेवन करून कोरोना व्हायरस इन्फेक्शनवर उपचार होऊ शकतो. पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे. कारण याचा काहीच पुरावा नाहीये. 

गैरसमज - पाळीव प्राण्यांमुळे पसरतो कोरोना व्हायरस

(Image Credit : maxim.com)

सत्य - ही बाब कोणत्याही रिसर्चमधून अजूनतरी सिद्ध झालेली नाही आणि याचे काही तसे पुरावे देखील मिळालेले नाहीत. आतापर्यंत पाळीव प्राण्यामुळे कोरोना व्हायरस पसरल्याची एकही घटना समोर आलेली नाही. 

गैसमज - अ‍ॅंटी-बायोटिक्सने होतो कोरोना व्हायरसवर उपचार

सत्य - WHO नुसार, अ‍ॅंटी-बायोटिक व्हायरस विरोधात काम करत नाहीत आणि ते केवळ बॅक्टेरियाने पसरणारं इन्फेक्शन विरोधात काम करतात. त्यामुळे या व्हायरसवर अ‍ॅंटी-बायोटिक्सचा काहीही परिणाम होत नाही.

गैरसमज - चायनीज फूड खाल्ल्याने होतो कोरोना व्हायरस

सत्य - हा सुद्धा सोशल मीडियात पसरलेला एक गैरसमज आहे. यात दावा करण्यात आला आहे की, चायनीज फूड आणि चायनीज रेस्टॉरन्टमध्ये गेल्याने कोरोना व्हायरसची लागण होते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. WHO ने चायनीज फूडला कोरोना व्हायरस होण्याचं कारण मानलेलं नाहीये. 

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्सSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना