स्वच्छ आणि सुंदर नखं सौंदर्यात भर घालतातच शिवाय नखांवरून एखाद्या व्यक्तीचं आरोग्यही कसं आहे, तेही समजू शकतं. नखं पांढरी होणं, नखांवर लाल-गुलाबीसर रंगाचे डाग किंवा ठिपके, नखांचं वारंवार तुटणं किंवा तडे जाणं हे देखील शरीरातल्या आजाराचं लक्षण असू शकतं. यकृत, फुफ्फुस आणि हृदयात उद्भवणारी कोणतीही समस्या नखांच्या माध्यमातून शोधली जाऊ शकते. नखांच्या बाबतीला कोणताही मोठा बदल गंभीर आजाराचेदेखील लक्षण असू शकतो. नखांची स्थिती पाहून कोणताही रोग ओळखता येतो. उदाहरणार्थ, पिवळी नखं अशक्तपणा, हृदयरोग, यकृत रोग किंवा कुपोषण दर्शवतात. जाणून घेऊया, नखांच्या (Nail Indicate Bad Health) आरोग्याबद्दल.
तुटलेली किंवा तडा गेलेली नखंवेब एमडीच्या मते, कोरडी किंवा तडे गेलेली नखं थायरॉईडचं असंतुलन दर्शवतात. नखं पिवळी पडणं आणि तुटणं किंवा झडणं हा देखील एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग असू शकतो.
रंगहीन नखंनखं रंगहीन होण्याला ल्युकोनीचिया देखील म्हटलं जाऊ शकते. या स्थितीत नखं पांढरी होतात. रंगहीन नखं दुखापत, अशक्तपणा, कुपोषण, हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार किंवा विषबाधा अशा अनेक कारणांमुळं असू शकतात.
पिवळी नखंनखे पिवळसर होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे बुरशीजन्य संसर्ग. जेव्हा संसर्ग खूप तीव्र होतो, तेव्हा नखं सैल होतात आणि तुटतात किंवा त्यांचे बारीक-बारीक तुकडे पडू शकतात. क्वचित प्रसंगी, पिवळी नखं हे थायरॉईड, फुफ्फुसांसंबंधी विकार, मधुमेह किंवा सोरायसिस इत्यादींसारख्या गंभीर आजारांना देखील सूचित करू शकतात.
नखं निळी होणंनिळी पडलेली नखं हे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचं लक्षण आहं. याचं आणखी एक लक्षण न्यूमोनिया किंवा इतर तत्सम संसर्ग असू शकतं. तर, काही प्रकरणांमध्ये निळी नखं हृदयरोगदेखील सूचित करतात.