(Image Credit : somnas.com)
झोपेसंबंधी वेगवेगळ्या आजारांबाबत आपण नेहमीच वाचत, ऐकत असतो. पण झोपेसंबंधी असेही अनेक आजार आहेत, ज्यांबाबत अनेकांना काहीच कल्पना नसते. असाच एक गंभीर आजार आहे. हा आजार असेल तर दिवसा अचानक झोप लागते. कितीही महत्वाचं काम असो ते काम करतानाही व्यक्ती एक डुलकी घेते. अनेकदा दर गाढ झोप घेतात. पण अशा समस्यांकडे लोक फार लक्ष देत नाही. झोपेची सामान्य सवय समजून याकडे दुर्लक्ष केलं जातं. या आजाराला नार्कोलेप्सी असं म्हटलं जातं.
(Image Credit : therecoveryvillage.com)
नार्कोलेप्सी आजारात व्यक्तीला फार जास्त झोप येते आणि झोपेवर त्यांचं काहीही नियंत्रण नसतं. तसेच झोपे आणि जागे होणे यातही काही स्पष्टता नसते. या झोपेत व्यक्ती वेगवेगळी स्वप्ने बघतात. पण असं झाल्यावर व्यक्ती आपले हात-पाय हलवू शकत नाही. या स्थितीला स्लीप पॅरालिसिस असं म्हटलं जातं.
कॅटाप्लेक्सी सुद्धा आहे नार्कोलेप्सीचं मुख्य लक्षण
(Image Credit : jaxsleepcenter.com)
अनेकदा या आजारात व्यक्तीचा विचित्र घटनाक्रम असतो. हसताना किंवा एखाद्या आवेगाच्या क्षणी व्यक्तीचे हात-पाय काम करत नाहीत. तसेच चालता-चालता व्यक्ती खाली पडतो. या स्थितीत ते जागे तर असतात पण त्यांचे अवयव अजिबात हालचाल करत नाहीत. मेडिकल सायन्समध्ये याप्रकारच्या मांसपेशी कमजोरीला कॅटाप्लेक्सी असं म्हटलं जातं. स्लीप पॅरालिसिसप्रमाणे कॅटाप्लेक्सी सुद्धा नार्कोलेप्सी एक महत्वपूर्ण लक्षण आहे.
मेंदूत तयार होत नाही हायपोक्रेटिन रसायन
(Image Credit : thesleepjudge.com)
कॅटाप्लेक्सी या समस्येने ग्रस्त रूग्णांच्या मेंदूच्या हायपोथॅलेमसमध्ये हायपोक्रेटिन नावाचं रसायन तयार होत नाही. हे रसायन निघत असल्यानेच आपण जागे राहतो. मग जर हे रसायनच तयार होत नाही तर जागणे त्यासंबंधी प्रक्रियांमध्ये समस्या येऊ लागतात. व्यक्तीला नार्कोलेप्सी समस्या होऊ लागते.
स्लीप मेडिसिन एक्सपर्टचा सल्ला
(Image Credit : healthline.com)
जर तुमच्या आजूबजूला अशा समस्येने पीडित व्यक्ती असेल तर त्यांची खिल्ली उडवू नका. त्यांच्याप्रति संवेदनशील रहावे. अशा व्यक्तींना स्लीप मेडिसिन एक्सपर्टची गरज असते. भारतात झोपेसंबंधी रोगांबाबत जागरूकता फार कमी केली जाते. अशात नार्कोलेप्सी, कॅटाप्लेक्सी आणि स्लीप पॅरालिसिस सारख्या समस्यांना लोक भूत-आत्मा मानून नको नको त्या गोष्टी करू लागतात.