(Image Credit : everyhealthclub.com)
पुरुषांना कॅलरीजची जास्त आवश्यकता असते. महिला आणि पुरुषांमधील हा फरक हार्मोन्समधील फरक आहे. जर तुमचा आकार, वजन आणि पौष्टीक गरजा बाजूला ठेवल्या तरी महिला आणि पुरुषांमध्ये अंतर आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये लाल रक्तपेशी अधिक असतात. ज्यामुळे पुरुषांच्या पोषक तत्त्वांच्या गरजेचं एक महत्वाचं कारण आहे. यासोबतच पुरुषांचं शरीर महिलांच्या तुलनेत प्लाज्मा ग्लूकोजच्या कमतरतेचा सामना करु शकत नाही.
महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या निरोगी आणि फिट राहण्यासाठी अधिक कॅलरीजची गरज असते. जर एखाद्या व्यक्तीचं वजन १८० पाऊंड असेल तर त्या पुरुषाला रोज साधारण २००० ते ३००० कॅलरीजची गरज असते. तेच १३० पाऊंडच्या एका महिलेला रोज साधारण १४०० कॅलरीजची गरज असते. जर तुम्ही फार शारीरिक मेहनत करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात ३०० ते ५०० कॅलरी अधिक घेऊ शकता. चला जाणून घेऊ पुरुषांना नियमीत कोणत्या कोणत्या तत्वांची गरज पडते.
प्रोटीन
पुरुषांनी अधिक प्रमाणात प्रोटीन घ्यायला हवं. जिमला जाणाऱ्या पुरुषांना मांसपेशी निर्माण करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. ते लोक जे मांसाहार करणे पसंत करतात, ते सहज मांस-मच्छी खाऊन प्रोटीन मिळवू शकतात. पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांना योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे जरा कठीण आहे. शाकाहारी लोकांना चणे, मटर, मूग, मसूर, उडीद, राजमा, गहू, मका यातून प्रोटीन मिळवता येऊ शकतं. पुरुषांनी नियमीत ५६ ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवं.
व्हिटॅमिन
पुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिनची गरज असते. व्हिटॅमिन्सचे सेवन करुन तुम्ही फिट राहू शकता. व्हिटॅमिन्स दोन प्रकारचे असतात फॅट सॉल्यूबल आणि वॉटर सॉल्यूबल. व्हिटॅमिन आपल्या इम्यून सिस्टीमला मजबूत करतात. सोबतच पेशी, हाडे, दातांना मजबूत करतात. तसेच पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठीही व्हिटॅमिन्स गरजेचे आहेत. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनीमिया, कमजोर दात, सांधेदुखी आणि केसगळती यांसारख्या समस्या होतात. आंबट फळे जसे लाल मिरची, ब्रोकोली, पालक, ब्रसल्स, स्प्राउट्स, जांभुळ, टोमॅटो, बटाटे आणि फ्लॉवर यात व्हिटॅमिन अधिक असतात.
कॅल्शिअम
कॅल्शिअम पुरुषांच्या आहाराचा एक महत्वाचा भाग असायला हवा. हे असं एक पोषक तत्व आहे ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. हाडांच्या कमजोरीचं प्रमुख कारण कॅल्शिअमची कमतरता असते. अनेकांना फार कमी वयातच हाडांची समस्या जाणवू लागते. त्यामुळे कॅल्शिअमकडे कधीही दुर्लक्ष करु नये. कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी पालेभाज्या, फळांचं सेवन करावं. दुधातही अधिक प्रमाणात कॅल्शिअम असतात.