दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरमध्ये नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, लोकांना शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व आणि संतुलित व पौष्टिक आहाराबाबत जागरूक करणं हा आहे. या दिवसांमध्ये प्रौढ व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वेगाने वाढताना दिसत आहे. तसेच मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी मुलांना काही खास पोषक तत्वांची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही पोषक तत्वांबाबत ज्यांचा तुमच्या मुलांच्या डेली डाएटमध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं...
कॅल्शिअम
मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये कॅल्शिअम सर्वात महत्वाचं असतं. कारण मुलांची हाड बळकट होण्यासाठी मदत होते. तसेच दातांसाठीही कॅल्शिअम अत्यंत आवश्यक ठरतं. हे स्नायू आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे वाढणाऱ्या वयासोबतच मुलांच्या आहारामध्ये कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. कॅल्शिअमचे मुख्य स्त्रोत म्हणजे, दूध, पनीर, दही, पालक, ब्रोकली, टोफू इत्यादी.
फायबर
फायबरयुक्त आहाराते सेवन प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरतं. परंतु लहान मुलांसाठी एका ठराविक प्रमाणात फायबर महत्त्वाचं ठरतं. फायबर मुलांची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि लहान वयात असणाऱ्या लठ्ठपणाचा धोका कमी करतं. मुलांच्या डेली डाएटमध्ये फायबरयुक्त फळं आणि भाज्या यांसारख्या नाशपती, अवोकाडो, सफरचंद, ओट्स, नट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
आयर्न
इतर पोषक तत्वांप्रमाणे आयर्नदेखील मुलांच्या आरोग्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण हे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या रेड ब्लड सेल्स वाढविण्यासाठी मदत करतं. आयर्नच्या कमतरतेमुळे अनिमिया आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रयत्न करा की, तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये मुबलक प्रमाणात आयर्नचा समावेश करा. जसं बीन्स, नट्स, डाळिंब, बीट आणि हिरव्या पालेभाज्या.
व्हिटॅमिन सी
आयर्नसोबत व्हिटॅमिन सी देखील शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी मदत करतात. तसेच शरीराचं आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत करतात. व्हिटॅमिन सी अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत करतं. त्यामुले मुलांच्या डाएटमध्ये आंबट फळं जसं संत्री, आवळा आणि किवीव्यतिरिक्त इतरही अन्य पदार्थांचा समावेश करा.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी हाडं आणि दात मजबुत करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त विटमिन डी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतं. विटमिन डीचा सर्वात उत्तम स्त्रोत म्हणजे, सूर्यप्रकाश. पण याव्यतिरिक्त अंडी, मांस, मासे आणि धान्य यांमधूनही व्हिटॅमिन डी मिळतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)