प्रत्येक मुलगी वयात आल्यावर तिच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडते. ती घटना म्हणजे मासिक पाळी. या मासिक पाळीविषयी अनेक समज-गैरसमज समाजात रूढ झालेले आपल्याला आढळतात. परंतु मासिक पाळी म्हणजे स्त्री जीवनाला मिळालेले वरदानाच आहे. मासिक पाळीदरम्यान स्त्रीयांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. पोटदुखीने अगदी हैराण व्हायला होते. बऱ्याचदा यावर उपाय म्हणून पेनकिलर अथवा काही औषधे घेतली जातात. यामुळे वेदना कमी होतात परंतु हा तात्पुरता उपाय असतो. या उपायांनी बरे वाटले तरी अनेकदा औषधांचे साईड इफेक्ट्स होतात. म्हणून या काळात होणारा त्रास दूर करण्यासाठी काही घरगूती उपायांची माहिती करून घेऊयात...
1. या दिवसांत आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे, तसेच गरम पाण्याच्या पिशवीने पोट आणि पाठ शेकवल्याने आराम मिळतो.
2. या दिवसांत मांसाहार कमी करावा तसेच कॅफेनयुक्त पदार्थ अथवा पेय घेणेही टाळावे.
3. आहारात रताळं आणि ग्रीन टीचा समावेश अवश्य करावा. त्यामुळे दुखणे कमी होते.
4. कोरफडीच्या रसामध्ये थोडे मध मिक्स करून घ्यावे त्यामुळे रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो आणि वेदना कमी होतात.
5. आहारात दूध आणि दूधाच्या पदार्थांचा समावेश करावा. दूधामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वेदना कमी होतात.
6. पोटावर लेव्हेंडर ऑईल लावून मसाज केल्यामुळे पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होण्यास मदत होते.
7. या दिवसांत शक्य तेवढे प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा.