Weight Loss Tips : शरीराचं वजन कंट्रोल केलं नाही तर हार्ट डिजीज, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, टाइप 2 डायबिटीज, स्ट्रोक, स्लीप एप्निया इत्यादी गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक नेहमीच वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात.
न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कोणताही चमत्कारिक उपाय नाहीये. वजन केवळ कॅलरी कमी करूनच कमी केलं जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही सेवन केलेल्या कॅलरीपेक्षा जास्त बर्न करता तेव्हा शरीर आधीच असलेल्या फॅटला बर्न करून एनर्जीसाठी वापरतं.
बेली फॅट कमी करेल मूग डाळ
मूग डाळीमध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असतं. ही खाल्ल्याने भूक शांत करणारं हॉर्मोन कोलेसीस्टोकिनिन वाढतं. याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. डाळीमधील प्रोटीनचा थर्मिक प्रभाव याला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक सुपरफूड बनवतो.
मठ्ठा(छास)
छास एक कमी कॅलरी असलेलं ड्रिंक असल्याने याने वजन कमी करण्यास खूप मदत मिळते. भूक शांत ठेवण्यासोबत याने वजन कमी होते. तुम्ही दुपारच्या जेवणासोबत याचं सेवन करू शकता.
चिया सीड्स
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स फार फायदेशीर फूड ठरू शकतं. यात फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. जे पोटाला जास्त वेळ भरलेलं ठेवतं. तसेच या बीयांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं, जे वजन कंट्रोल करण्यास मदत करतं.
राजगिरा
राजगिऱ्यामध्ये मेथिओनाइन नावाचं अमिनो अॅसिड असतं. जे अतिरिक्त फॅट दूर करण्यास मदत करतं. तसेच यात प्रोटीन आणि फायबरही भरपूर असतं. याने भूक कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
फ्लॉवरसारख्या भाज्या
फ्लॉवरसारख्या भाज्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. प्रोटीन, फायबर आणि लो कॅलरी यांच्या एकत्र येण्याने फ्लॉवर एक फरफेक्ट भाजी बनते. ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.