शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Navaratri 2019 : आता बिनधास्त करा उपवास; संशोधनातून सिद्ध झाले उपवास करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:22 AM

अवघ्या काही दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. यादरम्यान अनेक लोक मोठ्या संख्येमध्ये उपवास करतात. काही लोक पूर्ण 9 दिवसांचा उपवास ठेवतात. तर काही लोक फक्त 2 ते 3 दिवसांचा उपवास करतात.

(Image credit : BroBible)

अवघ्या काही दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. यादरम्यान अनेक लोक मोठ्या संख्येमध्ये उपवास करतात. काही लोक पूर्ण 9 दिवसांचा उपवास ठेवतात. तर काही लोक फक्त 2 ते 3 दिवसांचा उपवास करतात. अनेकजण उपवासादरम्यान फक्त पेय पदार्थांचं सेवन करतात. तर काहीजण मीठ नसलेल्या पदार्थांचं सेवन करतात. आता जर तुम्ही विचार करत असाल की, उपवास फक्त धर्म आणि श्रद्धा म्हणूनच केला जातो. तर असं अजिबात नाही. अनेक संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, उपवास करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

वजन कमी करण्यासोबतच मेंदूसाठी फायदेशीर ठरतो उपवास 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, साधारणतः फास्टिंग म्हणजेच उपवास जर एखादी व्यक्ती सतत ठेवत असेल तर त्याची वेळ 24 ते 72 तासांमध्ये असू शकते. परंतु, सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेन्ड सुरू आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यामध्ये फक्त 2 वेळा जेवलं जातं आणि त्यामध्ये 16 ते 17 तासांचा उपवास ठेवण्यात येतो. उपवास ठेवल्याने फक्त वजन कमी होत नाही तर पचनक्रियाही सुरळीत राहते. एवढचं नाहीतर उपवास केल्याने मेंदूचं कार्य सुरळीत होण्यासही मदत होते. जाणून घेऊया उपवास ठेवण्याचे फायदे : 

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत 

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, उपवास ठेवल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. खासकरून त्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं ज्यांना डायबिटीज होण्याची रिस्क असते. उपवास ठेवल्याने इंसुलिन रेजिस्टेंस कमी होतो. 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर 

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, रूटिनमध्ये उपवासाचा समावेश करणं हृदयासाठीही फायदेशीर ठरतं. 8 आठवड्यांतून एकदा उपवास केल्याने शरीरामध्ये एलडीएल म्हणजेच, बॅड कोलेस्ट्रॉलचं पातळी कमी होते आणि रक्तामध्ये असलेलं ट्रायग्लिसराइड्सही 25 टक्क्यांनी कमी होतं. 

एजिंगचे निशाण कमी होऊन दिर्घायुषी होण्यासाठी मदत 

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, उपवास ठेवल्यामुळे तुमचं वय वाढतं आणि दीर्घायुषी होण्यास मदत होते. शरीर आणि स्किनवर दिसून येणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी होऊ लागतात. एकूण फास्टिंग केल्याने व्यक्ती ला सर्वाइवल रेट वाढतो आणि दीर्घायुषी होण्यास मदत होते. 

असा ठेवा उपवास : 

  • आपल्या लाइफस्टाइलनुसार, त्यातून फास्टिंगची कोणतीही पद्धत निवडू शकता. 
  • वॉटर फास्टिंग - यामध्ये काही वेळासाठी फक्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. 
  • ज्यूस फास्टिंग - काही वेळासाठी फक्त फळं आणि भाज्यांचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. 
  • इंटरमिटेंट फास्टिंग - काही वेळासाठी दोन जेवणांमध्ये कमीत कमी 12 ते 16 तासांचा गॅप ठेवा. 
  • आंशिक फास्टिंग - यामध्ये खाण्या-पिण्याचे काही पदार्थ, प्रोसेस्ड फूड, अॅनिमल प्रोडक्ट, कॅफेन इत्यादींचं सेवन करत नाहीत. 
  • कॅलरी कंट्रोल - दररोज काही आठवड्यांपर्यंत कॅलरीवर स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवण्यात येतो.

 

उपवास ठेवताना काही आवश्यक गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं 

  • जर तुम्हाला डायबिटीस असेल तर ब्लड शुगर लेव्हलवर नियंत्रण ठेवणं कठिण असतं. त्यामुले तुमची तब्बेत बिघडू सकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास ठेवा. 
  • जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा तुम्ही गरोदर असाल तर डॉक्टरांच्या सल्ला घ्या आणि ते सांगितल ते फॉलो करा. 
  • जर तुम्ही 24 तासांपेक्षा जास्त वेळासाठी फास्टिंग करण्याचा विचार करत असाल तर मेडिकल सुपरविजनमध्ये राहूनच असं करा. 
  • उपवास ठेवलेला असताना जास्त मेहनतीचं काम करणं टाळा आणि जास्तीत जास्त आराम करा. 

 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Navratriनवरात्रीHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स