(Image Credit : gujarati.boldsky.com)
नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकांनी दिनचर्या बदलते. जे लोक ९ दिवस उपवास ठेवतात त्यांच्यासाठी हा उपवास केवळ डाएट नसून त्यांचं रुटीनही बदलतं. आध्यात्मात उपवासाला इश्वराच्या जवळ जाण्याचं माध्यम सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये याला सर्वोत्तम औषधी मानलं गेलं आहे. चला जाणून घेऊ उपवासाचे फायदे...
आयुर्वेदासहीत दुसऱ्या सर्वच चिकित्सेमध्ये उपवास म्हणजेच पोट रिकामं ठेवण्याची प्रथा आहे. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक आजारावर उपाय म्हणून उपवास केला जावा, पण अनेक समस्यांवर उपवास हा चांगला उपचार ठरतो. आयुर्वेदात आजार दूर करण्यासाठी शरीरातील विषारी तत्व दूर करण्याबाबत सांगण्यात आलं आहे आणि उपवास केल्याने विषारी तत्व शरीरातून काढले जातात. त्यामुळेच उपवासाला आयुर्वेदात सर्वोत्तम औषधी मानलं आहे.
हे आजार केले जाऊ शकतात दूर
जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रियाच चांगली होत नाही तर अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. याने आर्थरायटिस, असथमा, हाय ब्लड प्रेशर, नेहमीचा थकवा, कोलाइटिस, स्पास्टिक कोलन, इरिटेबल बॉवेल आणि अनेकप्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते.
वाढते एनर्जी लेव्हल
काही दिवसांचा उपवास भलेही तुमची एनर्जी कमी करतो, पण याने तुमची इच्छाशक्ती वाढते. उपवास जितका जास्त दिवसांचा असेल शरीराची ऊर्जा तितकी जास्त वाढेल. उपवास करणाऱ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो. तसेच याने चवीच्या ग्रंथी पुन्हा सक्रिय होऊन काम करु लागतात. उपवासाने आत्मविश्वास इतका वाढतो की, तुम्हाला अनेक आजारांशी लढण्याची एनर्जी मिळते.
असा करा उपवास
उपवासादरम्यान ताज्या फळांचं सेवन करणे सर्वात चांगलं. त्यासोबतच तुम्ही ताज्या कच्च्या भाज्या, सलाद इत्यादी सेवन करु शकता. उपवासात जितकं जास्त पाणी प्याल तितकं चांगलं. त्यासोबतच नारळाचं पाणीही तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं.