(Image Credit :independent.ie)
गर्भावस्थेत धुम्रपान केल्याने बाळाच्या आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हे नुकसान केवळ शारीरिकच नाही तर मानसिकही अशू शकतं. अशात लहान मुलांना सिगारेट आणि नशेची सवयही लागण्याची शक्यता असते. फिनलॅंडमध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार ही बाब समोर आली आहे की, गर्भावस्थेदरम्यान धुम्रपान केल्याने नवजात बाळाच्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. हा प्रभाव लहान मुलं मोठी झाल्यावर बघायला मिळतात. अशी लहान मुलं पुढे जाऊन ड्रग्सची नशा करण्याची शक्यता अधिक वाढते.
जास्त सिगारेटचा धोका
तुर्कू युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे मिकाएल एक्ब्लाद यांच्याद्वारे करण्यात आलेला रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ एपीडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चसाठी १९८७ ते १८८९ दरम्यान जन्माला आलेल्या बाळांची आकडेवारी एकत्र करण्यात आली होती. या मुलांच्या आईंना विचारण्यात आले की, त्या गर्भावस्थेत सिगारेट सेवन करत होत्या का? त्यानंतर ही आकडेवारी १९९४ ते २००७ दरम्यान देण्यात आलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शन रेकॉर्डसोबत जुळवण्यात आलं. यादरम्यान या मुलांचं वय पाच ते वीस वर्ष इतकं होतं.
या रिसर्चमधून असं आढळलं की, ११ पैकी एका मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडून औषध देण्यात आलं. हे औषध कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे किंवा तणावामुळे देण्यात आलं होतं. या अॅंटीडिप्रेसेंट्स औषधांमध्ये अनेक रसायने असेही असतात, ज्यांचा वापर नशेसाठी केला जातो. यात असं आढळलं की, मुलांना या नशेची सवय लागू शकते. एकूण मुलांमध्ये १४ टक्के असे होते, ज्यांच्या मातांनी गर्भावस्थेत दर दिवशी दहापेक्षा अधिक सिगारेट ओढल्या. तर ११ टक्के मातांनी दहापेक्षा कमी आणि ८ टक्के मातांना सिगारेट ओढली नाही.
सिगारेटने डिप्रेशन
अजूनही याबाबत माहिती मिळू शकली नाही की, सिगारेट ओढल्याने लहान मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होण्याचं मुख्य कारण काय आहे. असे मानले जात आहे की, कदाचित सिगारेटमध्ये असलेलं निकोटीन बाळाच्या मेंदूसाठी घातक असतं. असेही म्हटले जात आहे की, सिगारेट ओढल्याने मातेच्या शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन जात नाही आणि कमी ऑक्सिजनमुळे बाळाचा मेंदू योग्य प्रकारे विकसित होऊ शकत नाही.
न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये यावर करण्यात आलेल्या एका शोधात मायकल वायत्समन सांगतात की, 'सिगारेटचं डिप्रेशनसोबतही देणं-घेणं आहे. याआधीही अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लोक निराश असल्यावर सिगारेट ओढतात. पण सिगारेटमुळे डिप्रेशन कमी नाही तर अधिक वाढतं. मात्र पोटातील बाळांवर याचा परिणाम होतो हे पहिल्यांदाच समोर आलं आहे.