- मयूर पठाडेचारचौघांत शिंक आली आणि तीही मोठ्यानं तर आपल्याला किती चोरासारखं होतं ना?.. स्वत:चीच लाज वाटते. सर्दी झाली असेल तर परत परत शिंका येणार नाही याचीही किती काळजी आपण घेतो...त्यामुळे नाक चोंदतं, लालेलाल होतं, काहीतरी अस्वस्थ फिलिंगही येतं, पण तरीही आपण ते करतो. कारण काय? - तर ते विचित्र दिसतं..तोंडावर रुमाल न ठेवता शिंकणं तसं चुकीचंच. त्यामुळे सर्दी-पडसं, खोकला, तापासारखे सर्वसामान्य आजार तर पसरतातच, पण सार्वजनिक आरोग्य बिघडण्यात मोठा हातभारही लागतो.स्वाईन फ्लूसारखे आजारही शिंकेमुळे पसरू शकतात. आपल्याला लक्षात येत नाही, पण शिंकेमुळे नाकातून बाहेर पडणारे पाण्याचे कण फार लांबपर्यंत जातात. अगदी तीस फुटापर्यंतही. आणि त्यांचा वेगही बराच असतो. त्यामुळे शिंक आल्यावर नाकावर रुमाल ठेवणं केव्हाही चांगलं, पण कितीही आॅकवर्ड वाटलं तरी शिंक दाबून मात्र ठेऊ नका..ते आपल्यासाठी फारच घातक आहे.शिंक दाबून ठेवल्यानं काय होईल?१- शिंक आलेली असताना आपण ती दाबून ठेवली तर आपल्या कानांना इजा होण्याची शक्यता असते. कानाच्या पडद्यांवर त्यामुळे अतिरिक्त दाब येतो.२- शिंक बळजबरी दाबून ठेवली तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकते. डोळ्यांजवळची ब्लड व्हेसल त्यामुळे ओपन होऊ शकते.३- इतकंच नाही, आलेली शिंक परतवली तर सायनसचा त्रास सुरू होऊ शकतो आणि अगदी आपल्या कवटीपर्यंत, मेंदूपर्यंत त्याचा आघात पोहोचू शकतो.अर्थात कुठलेही आघात, आजार दुरुस्त करण्यासाठी आपली बॉडी नॅचरली प्रयत्न करीत असते, तो डॅमेज बºयाचदा बॉडी स्वत:च भरुनही काढते, पण प्रत्येकवेळी ते शक्य होईलच असं नाही.त्यामुळे शिंक आली तर येऊ द्या, काळजी तेवढी घ्या. घरात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही तुम्ही असलात, तरी लगेच तोंडावर नाकावर रुमाल ठेवा. गरज पडली तर तातडीने त्यावर उपचारही करा, पण ‘वाईट दिसतं’ म्हणून शिंकच दाबून ठेवण्याचा आततायी प्रकार कधीच करू नका.
आक्छीऽऽ.. कितीही आॅकवर्ड वाटलं तरी शिंक कधीच दाबून ठेऊ नका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:11 PM
शिंकण्यापेक्षा शिंक दाबून ठेवणं जास्त घातक आहे..
ठळक मुद्देकानाच्या पडद्यांवर दाब येतोडोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो सायनसच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकेलमेंदूलाही पोहोचू शकतो आघात