Laptop On Your Lap Side effect : लॅपटॉप आज आपल्या जीवनाचा महत्वाचं भाग झाला आहे. लॅपटॉप सोबत कुठेही घेऊन जाता येत असल्याने अनेक कामे सोपी झाली आहेत. बरेच लोक ऑफिस किंवा खुर्चीवर बसून कंटाळले की, लॅपटॉप मांडीवर घेऊन सोफ्यावर किंवा बेडवर बसतात. पण सोयीच्या नादात तुम्ही हे विसरता की, याने तुमच्यावर काय परिणाम होणार आहे किंवा हे असं करणं किती नुकसानकारक ठरणार आहे. चला जाणून घेऊन लॅपटॉप मांडीवर घेऊन बसल्याने काय नुकसान होतात.
तशी तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती असेल. तुम्हालाही लॅपटॉप मांडीवर घेऊन बसल्यावर काहीना काही समस्या जाणवत असेल. यात कंबरदुखी, खांदेदुखी, पाठ दुखणे अशा समस्या आहेत. यासोबत इतर अनेक गंभीर समस्या होतात ज्या तुम्हाला महागात पडू शकतात.
त्वचा खराब होते
वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार, तासंतास लॅपटॉप मांडी घेऊन काम केल्याने पुरूष आणि महिला दोघांनाही टोस्टेड स्किन सिंड्रोम होऊ शकतो. यात त्वचा जास्तवेळ लॅपटॉपच्या हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याने त्वचेवर रॅशेज येतात किंवा त्वचा जळू शकते. तसेच यातील रेडिएशनमुळे तुमच्या चेहऱ्यावरही प्रभाव दिसू शकतो. इतकंच नाही तर यामुळे तुम्हाला त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो.
पुरूषांमध्ये इनफर्टिलिटी
काही रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, जास्त वेळ लॅपटॉप मांडीवर घेऊन बसल्याने त्यातून निघणाऱ्या हीटमुळे पुरूषांमध्ये रिप्रोडक्टिव हेल्थचं नुकसान होतं. लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकतं. याचं कारण म्हणजे शरीराचा पोत. स्त्रियांमध्ये, गर्भाशय शरीराच्या आत असतं, तर पुरुषांमध्ये, अंडकोष शरीराच्या बाहेर असतो, ज्यामुळे उष्णतेचे किरण जवळ राहतात. उच्च तापमानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरते. त्यामुळे पुरुषांनी लॅपटॉप वापरताना विशेष काळजी घ्यावी.
बॉडी पोश्चर
लॅपटॉप टेबलवर ठेवून चालवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. जर तुम्ही याला जास्त वेळ मांडीवर ठेवून काम केलं तर याने तुमचं बॉडी पोश्चर खराब होऊ शकतं. तसेच मान दुखणे, पाठ दुखणे, खांदे दुखण्याची समस्या होऊ शकते.
रेडिएशन्समुळे नुकसान
हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होतात, तर ब्लूटूथ कनेक्शनमधून तेच रेडिएशन बाहेर येतात. रेडिएशनच्या प्रभावामुळे तुम्हाला झोप न येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.