New Body Part: शास्त्रज्ञांना मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लागला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांना शोधादरम्यान आपल्या श्वसनसंस्थेला (Respiratory System) निरोगी ठेवणाऱ्या एका नवीन अवयवाचा शोध लागला आहे. या नव्या अवयवामुळे शास्त्रज्ञांना आशेचा नवा किरण मिळाला आहे. त्यांना आशा आहे की, या अवयवामुळे धुम्रपानामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यास मदत होईल. अनेक वेळा धूम्रपानामुळे होणारे आजार रुग्णांसाठी प्राणघातक ठरतात.
पेशीसारखा दिसणारा अवयवलाइव्ह सायन्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मानवी शरीरात सापडलेला हा नवीन अवयव इतर पेशींसारखाच दिसतो. हा फुफ्फुसांमध्ये असलेल्या पातळ आणि अतिशय नाजूक शाखांमध्ये आढळतो. शास्त्रज्ञांनी या नवीन अवयवाला रेस्पिरेटरी एअरवे सेक्रेटरी(Respiratory Airway Secretory - RAS) असे नाव दिले आहे. रास पेशी स्टेम पेशींसारख्या असतात, त्यांना रिक्त कॅनव्हास पेशीदेखील म्हणतात.
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, संशोधकांना आढळले की, रास पेशी फुफ्फुसांवर अवलंबून असते. कारण त्यांचे सर्व काम फुफ्फुसांशी संबंधित यंत्रणांद्वारे चालते. शास्त्रज्ञांनी निरोगी व्यक्तीच्या फुफ्फुसाचे ऊतक(टिश्यू) घेतले, यानंतर प्रत्येक पेशीच्या आत असलेल्या जनुकांचे विश्लेषण केले असता त्यात त्यांना रास पेशी आढळून आल्या.
मुंगूसमध्येही याच पेशी आढळून आल्यापेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर एडवर्ड मॉरिसे म्हणाले की, मानवी फुफ्फुसाच्या शाखा(हवेचा मार्ग) उंदरांच्या फुफ्फुसांपेक्षा वेगळ्या असतात, हे आधीपासून माहित होते. पण, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही नवीन पेशी शोधण्यात मोठी मदत झाली आणि आम्ही त्याचा नमुना तपासू शकलो. संशोधनामध्ये असेही आढळून आले की, मानवांव्यतिरिक्त मुंगूस प्रजातीच्या फेरेट्सच्या(Ferrets) फुफ्फुसातदेखील रास पेशी आढळल्या आहेत. या मानवांमध्ये आढळणाऱ्या रास पेशींसारख्याच आहेत.
काय आहे RAS पेशींचे काम ?RAS पेशी असे कण सोडतात, ज्या ब्रॉन्किओल्स (रक्तामध्ये ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साइड सोडणारा)मध्ये वाहणाऱ्या द्रवरुपी पदार्थांवर एक अवरण बनवण्याचे काम करते. यामुळे आपल्या फुफुसाची क्षमता अधिक वाढते. या प्रोजेनिटर पेशींप्रमाणे, म्हणजेच एल्वियोलर टाइप-2 (एटी2) पेशींप्रमाणे काम करतात. या एक विशेष प्रकारच्या पेशी आहेत, ज्या दुखापतग्रस्त पेशींना ठीक करण्यासाठी रसायन तयार करतात.