नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव नेमका कुठून झाला, तो माणसांपर्यंत कसा पोहोचला, याबद्दल मतमतांतरं आहेत. कोरोना प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचला का, याबद्दल अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र आता सर्वांचीच चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा विषाणू कुत्र्यांकडून माणसांकडे येत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. अद्याप याबद्दलचं संशोधन पूर्ण व्हायचं आहे. संशोधनातून याबद्दल शिक्कामोर्तब झाल्यास प्राण्यांकडून माणसांपर्यंत येणारा हा आठवा विषाणू ठरेल.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासाप्राण्यांकडून माणसांपर्यंत पोहोचणारे सात प्रकारचे कोरोना विषाणू आतापर्यंत आढळून आले आहेत. यातील चार विषाणूंमुळे साधारण सर्दी आणि तीन विषाणूंमुळे SARS, MERS आणि COVID-19 सारखे आजार माणसांपर्यंत पोहोचले. 'क्लिनिकल इन्फेक्शियस डिजीज' नावाच्या जर्नलनं गुरुवारी एक संशोधन प्रसिद्ध केलं. 'मलेशियातील एका राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या ३०१ न्युमोनिया रुग्णांचे नेझल स्वॅब घेण्यात आले. त्यांची चाचणी करण्यात आली. यातील ८ नमुने कॅनाइन कोरोना विषाणूसाठी पॉझिटिव्ह होते. कॅनाइन कोरोना विषाणू कुत्र्यांमध्ये आढळून येतो. चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेले बहुतांश नमुने पाच वर्षांखालील मुलांचे आहेत,' अशी माहिती संशोधन अहवालात आहे.कोरोना उपचारासाठी कोणती लस सर्वात जास्त प्रभावी, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? ICMR च्या रिपोर्टमधून खुलासारुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचं जीनोम सीक्वेंसिंगदेखील करण्यात आलं. त्यातून CCoV-HuPn-2018 नावाचा एक नवा स्ट्रेन आढळून आला. हा स्ट्रेन बऱ्याच अंशी कोरोना विषाणूसारखाच आहे. यामुळे मांजरी आणि डुकरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरतो. मात्र या विषाणूची रचना बहुतांशी कॅनाइन कोरोना विषाणूसारखीच आहे. यामुळे कुत्र्यांमध्ये विषाणू पसरतो. संशोधनातून समोर आलेल्या या नव्या माहितीनं सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.
CoronaVirus News: धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:03 PM