नवी दिल्ली : आता तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या मदतीने ईसीजी स्वत: करु शकता आणि त्याचा रिपोर्ट मोबाईलवर बघू शकता. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हे डिवाईस वरदानापेक्षा कमी नाहीये, कारण जास्तीत जास्त लोकांना हृदयरोगाबाबत माहितीच पडत नाही. ते रुग्णालयात जातात तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. हे डिवाईस भारतात तयार झालं असून क्लिनिकली मान्यता मिळालेलं आहे.
कुणी केलं तयार हे डिवाईस?
नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हे डिवाईस नोएडा येथील राहुल रस्तोगी नावाच्या तरुणाने तयार केलं आहे. या इंजिनिअरने त्याच्या वडिलांच्या आजारापणातून बोध घेत हे डिवाईस तयार केलं. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांच्या छातीत वेदना होऊ लागल्या होत्या. पण ते काय हे समजू शकले नाही. रुग्णालयात पोहोचल्यावर कळालं की, त्यांच्या हृदयात ब्लॉकेज आहे. त्यामुळे त्याने हे मसीन तयार करण्याचं ठरवलं. बंगळुरुतील रुग्णालायत याचं ट्रायलही घेण्यात आली आणि ते ९८ टक्के योग्य असल्याचं आढळलं.
(Image Credit : NBT)
अंगठ्याने चालतं डिवाईस
हे डिवाईस मोबाईल अॅपला कनेक्टेड आहे. एका छोट्या बॉक्सप्रमाणे असलेल्या या डिवाईसवर दोन पॉईंट आहेत. जे दोन्ही अंगठ्यांनी दाबायचे असतात. याचा रिपोर्टही मोबाइलवर काही मिनिटांमध्ये बघायला मिळतो.