संशोधकांनी एका अशा डीएनए उपकरणाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे प्राचीन लोकांची पक्की ओळख पटवली जाऊ शकते. सोबतच जे प्राचीन लोक पृथ्वीवर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत राहत होते. त्यांच्याशी आताची एखादी व्यक्ती किती मिळती जुळती आहे हे जाणून घेण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
कसा होईल वापर
वर्तमानात प्राचीन डीएनएच्या अभ्यासासाठी एखाद्या मानवी सांगाड्याचा संबंध एखाद्या निश्चित लोकांशी जोडून सांगण्याची किंवा त्या व्यक्तीची उत्पत्ती शोधण्यासाठी खूपसाऱ्या सूचनांची गरज असते. ब्रिटनेच्या शेफील्ड विश्वविद्यालयातील एरॉन एलहेक यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या संशोधनात एन्सेस्ट्री इन्फोर्मेटिव्ह मार्कर्सची ओळख पटवली गेली. ज्यांचा वापर सांगाड्यांच्या वर्गीकरणासाठी केला जाऊ शकतो.
नवीन पद्धत विकसीत
एलहेक म्हणाले की, 'एआयएमचा प्रभावीपणे माहिती मिळवण्यासाठी आम्ही एक नवी पद्धत विकसीत केली आहे. प्राचीन लोकांमध्ये आधुनिक लोकांच्या तुलनेत जास्त विविधता होती. त्यांची ही विविधता नियोलिथिक क्रांति आणि ब्लॅक डेथसारख्या घटनांनंतर कमी होऊ लागली'.
योग्य पद्धतीने लागेल पूर्वजांचा शोध
एलहेक यांनी सांगितले की, 'विकृत डिएनएमुळे प्राचीन डेटा समजून घेणे अवघड आहे. आणि याच आव्हानाला उत्तर म्हणून आम्ही एक विशिष्ट उपकरण विकसीत केलं आङे. जे पारंपारिक आणि नव्या पद्धतींना एकत्र करुन तयार करण्यात आलं आहे. याने हे कळेल की, तुम्ही कुणाचे वंशज आहात.