पुरूषांसाठी गर्भनिरोधक म्हणून सर्वात सोपा उपाय म्हणजे कंडोम आहे. मात्र आता वैज्ञानिकांनी पुरूषांसाठी बर्थ कंट्रोलचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय शोधला आहे. हा रिसर्च ब्रिटनच्या एडिनबर्ग विश्वविद्यालयात केला जात आहे. हा उपाय एका जेलच्या रूपात असेल. या जेलचं नाव आहे NES/T. ज्याला पुरूषांसाठी गर्भनिरोधक म्हणून महत्वपूर्ण मानलं जात आहे. आशा केली जात आहे की, पुरूषांच्या या बर्थ कंट्रोलमुळे महिलांवरील बर्थ कंट्रोलचा भार कमी होईल.
रिसर्चमध्ये एडिनबर्ग विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी १०० पेक्षा अधिक पुरूषांना NES/T जेलचा वापर करण्यास सांगितले. हे जेल एक सिंथेटिकच्या रूपात काम करतं. जे प्रोजेस्टिन हार्मोनच्या माध्यमातून स्पर्मचा स्तर कमी करणे आणि टेस्टोस्टेरॉनच्या माध्यमातून कामेच्छा वाढवतं. हे जेल पुरूष त्यांच्या हाताच्या दंडावर आणि खांद्यावर लावू शकतात. त्यानंतर त्वचा या जेलमधील हार्मोन्स एब्सोर्ब करून पुरूषांमध्ये स्पर्मचं प्रॉडक्शन कमी करेल.
या रिसर्चमध्ये सहभागी पुरूषांनी हे जेल दररोज त्यांच्या दंडावर आणि खांद्यांवर लावलं. ट्रायल दरम्यान डॉ़क्टरांनी या पुरूषांच्या स्पर्म काउंटवर लक्ष ठेवण्यात आलं. NES/T जेल हे त्याच जेलप्रमाणे आहे जे कमी टेस्टोस्टेरॉन असलेले पुरूष त्यांच्या मांड्या आणि धडावर लावतात.
या ट्रायलनंतर अपेक्षा केली जात आहे की जास्तीत जास्त पुरूष कंडोम आणि मेल पिल्सऐवजी जेलचा वापर करणं पसंत करतील. डॉक्टर बेबाक अशरफी यांनी द टेलीग्राफला सांगितले की, 'जेलच्या वापरानंतर लोक जास्त संतुष्ट दिसतात'.डॉक्टर बेबाक अशरफी म्हणाले की, 'काही पुरूषांना गर्भनिरोधकाची ही पद्धत जरा जड वाटेल. कारण हे जेल सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यासोबतच हे एक नवं औषध आहे. त्यामुळे याचे परिणाम पूर्णपणे समजून घेणंही बाकी आहे. याच कारणाने काही लोक संकोच करतील'.