कॅन्सर हा जीवघेणा आजार असला तरी अनेकदा सुरुवातीच्या स्टेजला कॅन्सरचं निदान झालं तर बचाव करता येऊ शकतो. जर कॅन्सरचे निदान होईपर्यंत हा आजार शेवटच्या स्टेजला पोहोचला असेल तर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही तुम्ही फक्त एका प्रकारची रक्त तपासणी करून कॅन्सरची चाचणी करू शकता.
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार या ब्लड टेस्टद्वारे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा खुलासा होऊ शकतो. रिसर्चनुसार या टेस्टमुळे शरीरात कॅन्सरचा शिरकाव होण्याआधीच याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. जॉन हॉपकिंस या संशोधकाने या विषयावर संशोधन केलं होतं. ही ब्लड टेस्ट कॅन्सरशी झुंज देत असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी असेल. या टेस्टने आधीच कॅन्सर डिटेक्ट होत असल्यामुळे या जीवघेण्या आजारावर पहिल्या स्टेजमध्ये उपचार केले जाऊ शकतात.
अलिकडे १० हजार महिलांची ही टेस्ट करण्यात आली होती. या महिलांमध्ये कोणतीही लक्षण दिसून येत नव्हती. ज्यावेळी त्यांची टेस्ट पॉजिटिव्ह आली तेव्हा पीईटी आणि सिटी स्कॅनचा वापर करून ट्यूमरची तपासणी करण्यात आली. या महिलांमध्ये २६ प्रकारचे वेगवेगळे कॅन्सर दिसून आले. शरीरात कॅन्सरचा प्रसार होण्याआधीच या आजाराबद्दल माहिती मिळाली तर पहिल्या स्टेजपासूनच उपचार करता येतील. या टेस्टला Liquid biopsy हे नाव देण्यात आलं आहे. (हे पण वाचा-CoronaVirus News: हवेतील अल्ट्रावॉयलेट रेजमुळे नष्ट होऊ शकतो कोरोना, तज्ञांचा खुलासा)
या टेस्टमुळे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर अनेक महिलांची सर्जरी सुद्धा केली होती. ज्या महिलांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ६ महिलांना ओवेरियन कॅन्सरची लक्षणं दिसून आली . साधारणपणे या प्रकारचा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरल्यानंतर निदर्शनास येतो. त्यामुळे या आजारापासून जीव वाचवणं अवघड असतं. या महिलांमधील ९ महिलांना फुप्फुसांचा कॅन्सर होता. या टेस्टचा वापर करून अधिकाधिक महिलांच्या तपासण्या केल्या जात आहेत. तसंच या ब्लड टेस्टवर संशोधक अधिक रिसर्च करत आहेत. ( हे पण वाचा-CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी १० मिनिटं ऊन अंगावर घेणं गरजेचं, तज्ञांचा दावा)