शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

आता तुमचं नख सांगणार शरीरातील रक्ताचं प्रमाण; लवकरच येणार खास अॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:29 PM

आता रक्त न घेताच तपासता येणार शरीरातील रक्ताचं प्रमाण

नवी दिल्ली: शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी रक्त घ्यावं लागतं. मात्र आता शरीरातून रक्त न घेताही रक्ताचं प्रमाण योग्य आहे की नाही, याची तपासणी करता येणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे हे तपासण्यासाठी नखाचा फोटो पुरेसा असेल. अमेरिकेच्या इमोरी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केलेल्या अॅपमुळे अगदी सोप्या पद्धतीनं शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासता येईल. नखाचा फोटो अॅपवर अपलोड केल्यावर रक्ताचं प्रमाण तपासता येईल. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण नेमकं किती आहे, याची माहितीदेखील हे अॅप देईल. केवळ नखाच्या फोटोतून शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासणारं हे एकमेव अॅप असल्याचा दावा संधोशक विल्बर लाम यांनी केला आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी रक्त घ्यावं लागतं. सध्या सर्वत्र हीच पद्धत प्रचलित आहे. मात्र हे नवं अॅपदेखील त्याच पद्धतीइतकं अचूक असल्याचा दावा लाम यांनी केला आहे. रक्त न काढताही त्याची तपासणी करता येणं, हेच या अॅपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच हे अॅप इतरांपेक्षा वेगळं आहे, असा दावादेखील त्यांनी केला. या अॅपमध्ये मानकांनुसार काही फोटो टाकण्यात आले आहेत. वापरकर्त्यांनी त्यांच्या नखांचा फोटो अॅपवर अपलोड केल्यावर दोन्ही फोटोंची तुलना करुन शरीरातील रक्ताचं प्रमाण सांगितलं जाईल.या अॅपच्या माध्यमातून शरीरातील रक्ताचं नेमकं प्रमाण समजतं. मात्र यातून कोणताही आजार कळत नाही, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या अॅपचा वापर अगदी सहजपणे करता येईल. गर्भवती, खेळाडूंसाठी हे अॅप अतिशय फायदेशीर ठरेल, असं संशोधकांनी सांगितलं. जगातील दोन अब्ज लोकांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे. सध्या जगभरात रक्ताचं प्रमाण तपासण्यासाठी सीबीसी (कम्प्लीट ब्लड काऊंट) केलं जातं. मात्र या अॅपमुळे केवळ नखाच्या फोटोंवरुन रक्ताचं प्रमाण तपासता येईल. याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य