मुंबई: आधीपेक्षा जास्त वेगानं पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वीच आढळून आला. यानंतर आता ब्रिटनमध्येच कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. तो वेगानं संक्रमित होत असल्यानं जगाची चिंता वाढली आहे. एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक आणि संक्रामक असल्याचं मेदांता रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहन यांनी सांगितलं. लहान मुलांना नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती त्यांनी दिली. 'नव्या स्ट्रेनमुळे किती मुलांना कोरोनाची लागण झाली, याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र तरीही मुलांच्या बाबतीत जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे,' असं मत त्यांनी व्यक्त केलं.कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारानव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी दुप्पट सावध राहावं लागलं. जराशी ढिलाईदेखील महागात पडू शकते, असा धोक्याचा इशारा त्रेहन यांनी दिला. 'कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त वेगानं पसरतो. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करणाऱ्यांनादेखील नव्या स्ट्रेनचा धोका आहे. मास्क घालणाऱ्या, हात धुणाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे आता जास्त काळजी घ्यावी लागेल,' असं त्रेहान म्हणाले.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी सतर्कता गरजेची आहे. अजूनही अनेक जण मास्क न घालता बाहेर पडतात, लोकांच्या गाठीभेटी घेतात. पण नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. नवा स्ट्रेन सुपरस्प्रेडर असल्यानं तो शरीरात प्रवेश करण्याची शक्यता अतिशय जास्त आहे. त्यामुळे जास्त सावध राहून घराबाहेर पडताना काळजी घेणं अत्यावश्यक आहे, असं त्रेहान यांनी सांगितलं.
CoronaVirus News: कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन सापडला; जाणून घ्या धोका किती वाढला
By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 7:57 AM